शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रायव्हेट पार्टची पूजा केली, नंतर पॉर्न व्हिडीओ, २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:10 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभलमध्ये २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.  या टोळीकडून मुलींचे अश्लील व्हिडीओ जप्त केले आहेत. ही टोळी पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली लोकांना फसवत होती . धनवर्षा टोळी गरीब मुलींच्या कुटुंबियांना फसवून तांत्रिक विधी करत  असल्याचे सांगत होती. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

मिळालेली माहिती अशी, मुलींच्यावर तंत्र विधी केली जात असायची. या तंत्र विधी दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना बाहेर पाठवले जात होते आणि तंत्र विधी दरम्यान, मुलींच्या गुप्तांगांची आधी पूजा केली जायची आणि नंतर विधी केला जात होता. तांत्रिक विधीनंतर मुलींसोबत काय घडायचे याची माहिती मुलींनाही माहित नसायचे, यावेळी त्या मुलींचा व्हिडीओ बनवला जात होता. यानंतर हे व्हिडीओ पॉर्न साईट्सना विकल्याचाही संशय आहे.

धक्कादायक! प्राथमिक मराठी शाळेतील कर्मचाऱ्याकडून १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन दिवसापूर्वी राजपाल नावाच्या एका तरुणाचे अपहरण करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मिळाली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. ही टोळी लोकांना पैशांचा वर्षाव करण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवते. ते गरीब कुटुंबांना लक्ष्य करायचे. ते एखाद्या दुर्मिळ वस्तूवर म्हणजेच २० नखे असलेला कासव, दोन डोके असलेला साप, घुबड, विशेष क्रमांक असलेल्या चलनी नोटा या गोष्टींची वापर तांत्रिक विधीसाठी वापरत होते. मुलींना टीटी म्हटले जात असे आणि त्यांना तांत्रिक विधींसाठी तयार केले जायचे. 

यो टोळीतील लोक गरीब कुटुंबियांना फसवत होते. त्या कुटुंबीयांना तुमच्या मुलीमध्ये विशेष गुण आहेत असं सांगून तांत्रिक विधी केला तर पैशांचा पाऊस पडेल असं आमिष दाखवत होते.

तंत्र-मंत्राच्या नावाखाली तस्करी

ही टोळी तांत्रिक विधींद्वारे संपत्तीचे आमिष दाखवून गरीब मुला-मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषण करत असे आणि दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या बेकायदेशीर तस्करीमध्येही सहभागी होती. या टोळीचे जाळे दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये पसरले आहे. हे लोक तंत्रक्रियेच्या नावाखाली एखाद्या विशिष्ट वस्तूवर लोकांची फसवणूक करत होते. सध्या आग्र्यात टोळीचे नेटवर्क वेगाने वाढत आहे, आग्रा येथून या टोळीला पोलिसांनी अटक केली.  या प्रखरणी पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केला आहे या टोळीचे देशभर जाळ पसरल्याचा संशय पोलिसांना आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस