जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबाबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. 'छांगुर गँग' तरुणींचं शोषण करत असल्याचा मोठा दावा केला जात आहे. महिलांनी 'छांगुर नेटवर्क'चा आता पर्दाफाश केला. ही गँग सामूहिक बलात्कार करायची, सिगारेटचे चटके द्यायची, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करायची. छांगुर गँगने ५००० हून अधिक मुलींचं धर्मांतर केलं आणि सौदी अरेबियापर्यंत त्यांचं हे नेटवर्क पसरलं आहे.
एका महिलेने दावा केला आहे की, तिने सनातन धर्म पुन्हा स्विकारला तेव्हा तिला सौदी अरेबियातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..." असं म्हटलं. यानंतर महिलेने मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे. आम्हाला न्याय द्या आणि या गुन्हेगारांना फाशी द्या असं आवाहन केलं आहे.
सौदी अरेबिया ते भारतात धर्मांतर करण्यासाठी एक 'कोडवर्ड' देखील आहे. 'धरती पलट' च्या नावाखाली मुली विकल्या जातात. छांगुर गँगचे लोक महिलांचं ब्रेनवॉश करतात. संपूर्ण कुटुंबाचं धर्मांतर केलं जातं.
योगी सरकारने छांगुर बाबाला जोरदार दणका दिला आहे. बेकायदेशीर साम्राज्यावर सरकारने बुलडोझर चालवला. यूपीएटीएस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालयाने १७ जुलै रोजी बलरामपूर ते मुंबईपर्यंत एकूण १४ ठिकाणी छापे टाकले. य़ा प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.