शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 14:04 IST

गेली चार दिवस पोलिसांकडे न्याय मागणाऱ्या या अबलेला मदत मिळालेली नाही. परंतु,सासरच्या मंडळीवर मेहेरबान पोलिसांनी "भरोसा" न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने "ती" मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे : पोलिसांकडून मात्र '' भरोसा '' नाही

पुणे - आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहितेचा दिर व सासरच्या मंडळीनी छळ करून पतीला भेटण्यास अटकाव केल्याचा प्रकार विश्रांतवाडीत घडला असून गंभीर बाब म्हणजे  पोलिसांनी पीडित विवाहितेचीच मध्यरात्री उलटतपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. आठ दिवसांपासून पतीला भेटू न देता तिला सासरी नेऊन देखील तिचा अप्रत्यक्ष मानसिक छळ दिर व इतर नातेवाईक करत आहेत.याप्रकरणी गेली चार दिवस पोलिसांकडे न्याय मागणाऱ्या या अबलेला मदत मिळालेली नाही. परंतु, सासरच्या मंडळीवर मेहेरबान पोलिसांनी "भरोसा" न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने "ती" मदतीच्या प्रतीक्षेत आहे. प्रतिकनगर येथील एका युवतीची शांतीनगर येथील एका टेलर युवकासोबत 2013 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र त्याच्या कुटुंबियांच्या दुसर्या जातीतील मुलीसोबत विवाहाला विरोध होता. खर्या प्रेमासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह करण्याचे ठरवले. त्यासाठी "तिने" मनावर दगड ठेवून "धर्मांतर" करून 2016 मध्ये त्याच्या सोबत "निकाह" केला. सुरूवातीला काही दिवस हि बाब त्यांनी कुटुंबियांच्या पासून  लवपून ठेवली. त्याने तिला वेगळे घर घेऊन त्यांनी संसार सुरू केला. मात्र तीला सासरच्या मंडळीचा विरोध अजूनही  कायमच होता. लग्नाचा कायदेशीर पुरावा नसल्यामुळे त्याने 8 जानेवारी 2019 मध्ये पुन्हा कोंढवा येथे मौलवींकडून निकाहना पढून विवाह करण्यात आला.तसेच तिचे धर्मांतर केल्याचे ?फिडेव्हिट वकिलांकडून बनविण्यात आले. दरम्यानच्या काळात घरच्या मंडळीच्या दबावाखाली त्याने यापूर्वी मूळ गावी जाऊन दुसरे लग्न केले. तिने त्याला याबाबत विचारणा केली असता वडिलांच्या आजारपणाची सबब पुढे केली. नंतर काही वेळाभेटी गाठी होत होत्या मात्र 5 जुलै पासून तिचा पतीशी संपर्क होत नव्हता. हि बाब तिने तिच्या काही  नातेवाईकांना सांगून मदत मागितली. त्यांनी शांतीनगर येथे राहणारे तिचे दिर व इतर नातेवाईकांशी चर्चा करून तिला तिच्या सासरी त्यांच्या सोबत पाठवण्यात आले.मात्र तिच्या दिराने रात्री उशिरा आमच्या घरात अनोळखी महिला आल्याचा खोटा फोन पोलिस  नियंत्रण कक्षाला केला.विश्रांतवाडी पोलिसांनी खातरजमा न करता त्या पिडीत विवाहितेला चौकशीसाठी मध्यरात्री पोलिस स्टेशन येथे आणले. नंतर सारवासारव करीत प्रकार मिटवून घेतला. तिच्या पतीला पोलिसांसमोर घेऊन येतो अशा थापा तो गेली चार दिवस मारत दिशाभूल करीत आहे. सदरच्या पिडीत विवाहितेने शनिवारी  ग्रीनतारा फांऊडेशनच्या महिला समुपदेशकासह पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांची भेट घेतली. याप्रकरणी त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र अद्याप देखील सदरची महिला ही सासरच्या  मंडळीच्या दहशतीखाली असून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस