शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची दोन चिमुकल्यांसह गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:35 IST

दोन चिमुकल्यांसह मातेने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेदरम्यान उघडकीस आली.

वाशिम  - दोन चिमुकल्यासह मातेने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेदरम्यान उघडकीस आली. जयश्री गवारे असे मृतक महिलेचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, तोंडगाव माहेर असलेल्या जयश्री गजानन गवारे हिचे सासर जांभरूण नावजी ता. वाशिम असून सासरकडील मंडळीच्या त्रासाला कंटाळून जयश्री ही मोठा मुलगा गणेश (४) तर लहान मुलगा मोहित (२) या दोन चिमुकल्यासह गत एका वर्षापासून तोंडगाव येथे वडीलांच्या घरी राहत होती. १७ जुलै रोजी या प्रकरणावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा प्रयत्न नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला. मात्र, याला सासरकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १८ जुलै रोजी सकाळी तोंडगाव येथील राहत्या घरात दोन मुलांसह जयश्री गवारे हीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेचा पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत. शवविच्छेदनास साडेचार तास विलंबमृतक जयश्री गवारे हिच्यासह गणेश व मोहित यांचा मृतदेह सकाळी ११ वाजेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मात्र, येथे वैद्यकीय अधिका-यांसह संबंधित कर्मचारी उपस्थित नसल्याने तब्बल साडेचार तास विलंबाने शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकाराबद्दल रोष व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम