दुचाकीस्वार दाम्पत्यास घाटात अडविले, पतीला मारहाण, महिलेवर केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 04:38 PM2022-03-07T16:38:54+5:302022-03-07T16:39:10+5:30

Crime News : एकाने तिच्या पतीला धरून ठेवले व दुसऱ्याने तिला रस्त्याला कडेला नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला.

Women raped by two unidentified persons on Dhad-Buldhana road | दुचाकीस्वार दाम्पत्यास घाटात अडविले, पतीला मारहाण, महिलेवर केला अत्याचार

दुचाकीस्वार दाम्पत्यास घाटात अडविले, पतीला मारहाण, महिलेवर केला अत्याचार

googlenewsNext

बुलडाणा : धाडकडून बुलडाण्याकडे येणाऱ्या पती-पत्नींची दुचाकी अडवून पतीस मारहाण करून विवाहितेवर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. ही घटना ६ मार्च रोजी रात्री ११ ते ११.३० वाजता दरम्यान बुलडाणा-धाड रोडवरील चिखला घाटात घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध विविध कलमान्वये ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका २४ वर्षीय विवाहितेने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार,शहरातील एका नगरात राहणारे पती-पत्नी ६ मार्च रोजी काही कामानिमित्ताने धाड येथे सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान गेले होते. काम अटोपून रात्री दहा वाजता धाडहून बुलडाण्याकडे येत असताना रात्री ११.३० वाजता दरम्यान चिखला घाटाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. हातात दगड घेऊन पतीला बेदम मारहाण करून एकाने तिच्या पतीला धरून ठेवले व दुसऱ्याने तिला रस्त्याला कडेला नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्यानेही विवाहितेवर जबरदस्ती अत्याचार केला. घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेत पती-पत्नी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय प्रशासनाने ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडिता व तिच्या पतीचा जबाब घेतला. याप्रकरणी विवाहितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध विविध कलमान्वये ७ मार्च रोजी सकाळी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पीडित विवाहिता आणि तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे करीत आहेत. अद्याप आरोपींचा शोध लागला नसून, शोध सुरु असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Women raped by two unidentified persons on Dhad-Buldhana road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.