शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड बनून महिला पोलिसाने आवळल्या कुख्यात गुंडाच्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:21 IST

महिला पोलिसाने गर्लफ्रेंड बनून कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - प्रेमाच्या जाळ्यात ओढून बड्या व्यक्तींना, व्यापाऱ्यांना फसवल्याच्या अनेक घटनांबाबत तुम्ही ऐकल्या असतील. पण दिल्ली पोलिसांनी चक्क गुन्हेगारांकडून वापरण्यात येणार हाच फंडा वापरून एका कुख्यात गुंडाला बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलीस दलात सेवेत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने एका सराईत गुंडाला सुरुवातीला आपल्या गोड बोलण्यामध्ये गुंतवले. त्यानंतर त्याच्याशी त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाने  चॅटिंग सुरू केली. मग वेशांतर करून त्याला भेटण्यासाठी बोलावले. अखेरीस जेव्हा हा गुंड तिला भेटण्यास आला तेव्हा मुंडका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच या गुंडाने दिलेल्या माहितीवरून त्याच्या अजून दोन साथीदारांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.    याबाबत डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, ''गुरुवारी मुंडका पोलीस ठाण्याच्या हद्दील एक कॅब लुटण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी जेव्हा कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा सोमवीर नावाच्या एका आरोपीच्या कथित प्रेयसीची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून मोबाईल घेत तो आपल्या एका महिला कॉन्स्टेबलकडे दिला. त्यानंतर तिने सोमवीरसोबत चॅटिंग सुरू केली.''''ती त्याला भेटण्यासाठी खूप उत्सूक असल्याची जाणीव तिने सोमवीरला करून दिली. तिच्यावर विश्वास बसल्यानंतर सोमवीरने भेटण्यासाठी वेळ आणि ठिकाण निश्चित केले. दरम्यान, पोलिस तिथे सापळा लावून दबा धरून बसले. त्यानंतर सोमवीर तिथे आला असता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतल्यानंतर प्रदीप आणि मनोज यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिस