शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या महिलेचा सुरीने वार करून खून; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 21:01 IST

ही महिला होती दीर्घकाळापासून आजारी होती.

ठळक मुद्दे याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

पुणे : दीर्घ आजाराला कंटाळून घरातून बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यावर सुरीने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वानवडीपोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.ज्योती दीपक कांबळे (वय ३५, रा. मंजुळाबाई चाळ, भवानी पेठ) असे यामहिलेचे नाव आहे. ही घटना २६ मे रोजी कमांड हॉस्पिटलच्या मागील बाजूला २६मे रोजी सकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली.याप्रकरणी दीपक कांबळे यांनी वानवडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती कांबळे या दीर्घकाळापासून आजारी होत्या. त्यांना दोन महिन्यांपासून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते.त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. २६ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता त्या फिरायला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडल्या. त्या परत आल्या नाही. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या मिळूनआल्या नाहीत. कमांड हॉस्पिटलच्या मागील बाजूला एका रखवालदाराने महिला पडली असल्याचे पाहिले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दीपक कांबळे यांनी तो मृतदेह ज्योती यांचाच असल्याचे ओळखले. त्यांच्या गळ्यावर एक सुरीने वार केल्याची खूण होती. याबाबत पोलिसांनी शवविच्छेदनात हा वार स्वत: करून घेतला की दुसऱ्यांनी केला असल्याची शक्यता आहे, याविषयी डॉक्टरांचे मत मागितले होते. डॉक्टरांच्या मतानुसार पोलिसांनी अज्ञात गुन्हेगाराविरोधातखुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :WanvadiवानवडीCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस