शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

तो डॉक्टर नव्हे हैवान...! डॉक्टर पतीने घटस्फोटासाठी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही विषाणू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 12:24 IST

डॉक्टर असलेल्या पतीने विवाहितेच्या शरीरात चक्क एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथे उघडकीस आला आहे.  

ठळक मुद्देमहिलेचा तीन वर्षांपूर्वी विवाह विवाहितेला एड्सची बाधाकुटुंबातील पती-सासू, सासरे यांनी व्यवसाय करण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा

वाकड : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करूनही अवास्तव पैशांची मागणी पूर्ण होत नसल्याने घटस्पोट मिळविण्यासाठी डॉक्टर असलेल्या पतीने विवाहितेच्या शरीरात चक्क एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथे उघडकीस आला आहे.         याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती उमेश रामायण विश्वकर्मा, सासरे रामायण विश्वकर्मा, सासु पार्वती रामायण विश्वकर्मा (रा. सर्वजन. एकता कॉलनी, पडवळ नगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       याबाबत फौजदार संगीता घोडे यांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी महिलेचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्यानंतर कुटुंबातील पती-सासू, सासरे यांनी व्यवसाय करण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला त्यापैकी काही पैसे मिळविले देखील मात्र पैसे मिळत असल्याने त्यांच्या मागणीचा आकडा वारंवार वाढतच गेल्याने अखेर फिर्यादी महिलेने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे आरोपींनी शिवीगाळ  मारहाण करून पैसे मिळत नसल्याने तिचा घटस्फोटासाठी मानसिक शारीरिक छळ सुरू करण्यात आला.  पीडितेचा पती एका खाजगी रुग्णालयात डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतो.दरम्यान ती महिला आठ महिन्यापूर्वी आजारी असताना उपचाराच्या बहाण्याने तीच्या सलाईनमध्ये एचआयव्हीचे विषाणू सोडले. यामुळे त्या महिलेला एचआयव्हीची बाधा झाली आहे.         सर्व तोपरी प्रयत्न करून रुग्णाचे जीव वाचविनाऱ्या डॉक्टरला सर्वजण देवाचा अवतार असल्याची उपमा देतात मात्र थेरगावमध्ये घडलेल्या डॉक्टरच्या हैवानी कृत्याने सर्वजण संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :HIV-AIDSएड्सCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरWomenमहिलाPoliceपोलिसThergaonथेरगाव