शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवरच्या मैत्रीतून महिलेने घातला एकाला साडे तेहतीस लाखांना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:08 IST

फिर्यादीची एका महिलेबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली

ठळक मुद्दे बँकेच्या विविध नऊ खात्यांवर ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांची रक्कम वर्गफसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज दाखल घरच्यांना नव्हती एवढ्या मोठ्या आॅनलाईन व्यवहाराची कल्पना गुन्हा दाखल होईपर्यंत

पुणे :  इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका महिलेने एका तरुणाला तब्बल ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी एका अज्ञात महिलेविरुध्द ३७ वर्षाच्या पुरुषाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची एका महिलेबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर महिलेने भारतात पैसे गुंतविणार असल्याचे त्या व्यक्तीला सांगून व्हॉटसअपवर लंडन ते दिल्ली या विमान प्रवासाच्या तिकीटाचा फोटो पाठविला. तसेच १० सप्टेंबर रोजी दिल्ली एअरपोर्ट येथे येणार असल्याची माहिती दिली. या तारखेला फिर्यादीला दिल्ली कस्टम कार्यालयातून एकाचा फोन आला. त्या व्यक्तीने तुमच्या ओळखीची महिला परदेशातून दिल्ली येथे आली असून तिने यलो पेपरची पुर्तता केली नाही. तसेच तिने सोबत महागड्या वस्तू व फॉरेन करंन्सी आणल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादीला फॉरेन करंन्सी त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी, दिल्ली ते पुणे विमान तिकीट, फंड रिलीज आॅर्डर आदी कारणांसाठी वेळोवेळी फोन करुन बँकेच्या विविध नऊ खात्यांवर ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांची रक्कम वर्ग करण्यास सांगितले. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित महिलेने संपर्क क्रमांक बंद केला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.   फिर्यादीच्या घरच्यांना नव्हती कल्पना  एव्हीएशन कंपनीत फिर्यादी मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे. त्याने २६ दिवसांच्या कालावधीत घरातील, बँकेतील व इतर ठिकाणी गुंतवलेले पैसे आॅनलाईन पध्तीने संबंधित कस्टम अधिका-याच्या सांगण्यावरुन भरले आहेत. विशेष म्हणजे घरच्यांना एवढ्या मोठ्या आॅनलाईन व्यवहाराची कल्पना गुन्हा दाखल होईपर्यंत नव्हती.  

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसWomenमहिलाInstagramइन्स्टाग्रामcyber crimeसायबर क्राइम