महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला; टिटवाळ्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:46 IST2019-11-01T23:46:18+5:302019-11-01T23:46:27+5:30
तपासाचे आव्हान

महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला; टिटवाळ्यातील घटना
टिटवाळा : महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह शहरातील मातादी मंदिरालगत बल्याणी टेकडी परिसरात कचऱ्याच्या ढिगाºयात शुक्रवारी आढळून आला. त्यामुळ शहरात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या महिलेचा खून झाला की, तिला कोणी जाळले, अशा चर्चा दबक्या आवाजात परिसरात सुरू होत्या.
दरम्यान, आठवडाभरापूर्वी खडवली-नडगाव परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. अद्याप त्या गुन्ह्याचा उलगडा झालेला नसतानाच शुक्रवारी पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.