शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचे कपडे अचानक होतात गायब; तक्रारीने पोलीस गेले चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 21:07 IST

Invisible Power : आपले कपडे, पैसे आणि अन्न चोरून तसेच दागिन्यांचे वजन घटले असून या अदृश्य शक्तीपासून मुक्तता मिळवण्याची विनंती केली आहे. याबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत.

बैतुल - मध्य प्रदेशातील एका सरकारी महिला अभियंत्याने बैतूल जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्यात अर्ज करून आपले कपडे, पैसे आणि अन्न चोरून तसेच दागिन्यांचे वजन घटले असून या अदृश्य शक्तीपासून मुक्तता मिळवण्याची विनंती केली आहे. याबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत.काय आहे संपूर्ण प्रकरण?बैतुल येथील पंतप्रधान ग्रामीण रस्ते प्रकल्पात काम करणाऱ्या श्रुती झाडे या महिला अभियंत्याने ही तक्रार केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी रत्नाकर हिंगवे म्हणाले, 'या महिला अभियंत्याने शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर लेखी अर्ज दिला आहे. अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, काही अदृश्य शक्ती ज्याचे पाय दिसतात आणि कधी पांढर्‍या किंवा काळ्या कपड्यांमध्ये तिच्या घरी येते आणि तिने तयार केलेले अन्न खाते. एवढेच नाही तर या अदृश्य शक्तीने तिच्या सोन्याच्या दागिन्यांचे वजनही कमी केले आहे. यासोबतच ती घरात ठेवलेले कपडे आणि पैशांवरही हात साफ करते.

पोलिसांना आवाहन केलेशहरातील टिकारी भागात राहणाऱ्या या महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या ४-५ दिवसांपासून ती घाबरलेली आहे. काही उपाय करून या संकटातून सुटका करावी, अशी मागणी या महिलेने पोलिसांकडे केल्याचे हिंगवे यांनी सांगितले.या महिलेच्या तक्रारीवर हिंगवे म्हणाले की, कधी कधी भ्रमामुळे मनात जे चालले असते ते प्रत्यक्षात घडताना दिसते, तर प्रत्यक्षात असे काहीही घडत नाही. त्यांचा काहीसा गोंधळ झाला असावा. त्यांना समजावून सांगून त्यांच्या मनातील भ्रम व संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश