शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

अक्सा बीचवर सापडला महिलेचा मृतदेह, रिक्षाचालकाला १ लाखाची सुपारी दिल्याचं उघड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 21:18 IST

Murder : मालवणी पोलिसांना २४ डिसेंबर रोजी अक्सा बीचवर एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता.

ठळक मुद्देया प्रकरणी कमल, गुप्ता आणि सिंह या तिघांना पोलिसांनी अटक केली.    

मुंबई - मालाड येथील अक्सा बीचवर बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. तब्बल सहा दिवसांनंतर या हत्येची उकल करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी महिलेच्या सासऱ्याला आणि दोन रिक्षाचालकांना अटक केली आहे. या प्रकरणी कमल, गुप्ता आणि सिंह या तिघांना पोलिसांनी अटक केली.    नंदिनी ठाकूर (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. नंदिनीचा विवाह तीन वर्षांपूर्वी पंकज राय याच्याशी झाला होता. आंतरजातीय विवाह असल्याने पंकजच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. पंकजचे वडील कमल (५५) यांना या लग्नामुळे त्यांच्या बिहारमधील मूळगावी अपमान सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वीच नंदिनीच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी एका रिक्षाचालकाला १ लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे कमलने पोलिसांना सांगितले.मालवणी पोलिसांना २४ डिसेंबर रोजी अक्सा बीचवर एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. तिच्या हातावर टॅटू होता. तिच्या गळ्यात नेकलेस आणि मंगळसूत्रही होते. त्यानंतर कांदिवली पूर्वेतून ती महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. समता नगर पोलीस ठाण्यात तिचा फोटो होता. तिच्या गळ्यात तशाच प्रकारचा नेकलेस आणि मंगळसूत्र होते, अशी माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातूनच या हत्येचा छडा लागला. पोलीस तपास केला असता मृत महिलेचा पती पंकज आणि त्याची आई हे छटपुजेसाठी बिहारला गेले होते. त्यावेळी नंदिनी आणि तिचा सासरा कमल हे दोघेच घरी होते. कमलकडे चौकशी केली असता, त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळत होती. कमलच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता पोलिसांनी बऱ्यापैकी माहिती मिळाली. 

९ डिसेंबरच्या रात्री कमल संपूर्ण रात्रभर रिक्षाचालक प्रदीप गुप्ता याच्यासोबत होता. त्यानंतर गुप्ता हा उत्तर प्रदेशात निघून गेला होता. गुप्ता आणि आणखी एक रिक्षाचालक कृष्णकांत सिंह हे ९ डिसेंबरला कमलच्या घरी आले होते. त्यांनी नंदिनीला पकडून ठेवले. त्यानंतर एकाने उशीने तिचे तोंड दाबले. तिचा मृत्यू झाल्यानंतर बेडशीटमध्ये तिचा मृतदेह गुंडाळला आणि बॅगमध्ये भरला. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह समुद्रात फेकून दिला, अशी माहिती मालवणी पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Murderखूनauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसArrestअटक