मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आई अन् मुलीनं स्वत:ला पेटवून घेतलं; विरोधकांनी योगी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:47 AM2020-07-18T10:47:55+5:302020-07-18T11:11:50+5:30

अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे.

Woman Tried To Self Immolate In Front Of Lokbhawan Lucknow in Uttar Pradesh | मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आई अन् मुलीनं स्वत:ला पेटवून घेतलं; विरोधकांनी योगी सरकारला घेरलं

मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आई अन् मुलीनं स्वत:ला पेटवून घेतलं; विरोधकांनी योगी सरकारला घेरलं

Next
ठळक मुद्देएका नाल्याच्या वादातून गुंडांकडून महिलेला मारहाण प्रकरणाची कोणतीही दखल न घेतल्याने महिला आणि तिच्या मुलीने पेटवून घेतले. सध्या दोघींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु, आईची प्रकृती गंभीर

लखनऊ – अमेठी जिल्ह्यातील एक महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या गेटजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघींना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अनेकदा पोलीस कार्यालयाबाहेर चक्करा घातल्या पण कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा महिलेचा आरोप आहे.

माहितीनुसार, अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे. सध्या या महिलेची स्थिती गंभीर आहे. अमेठीत एका नाल्याच्या विवादातून काही लोकांनी महिलेला जबरदस्ती मारहाण केली होती. पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतरही त्या लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर त्यांना मारहाण केली. तसेच पीडित महिलेला अपघात करुन तिचं खोटं नाव टाकू अशी धमकीही दिली. या प्रकरणावर सुनावणी होत नसल्याने महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी लखनऊ येथे पोहचून मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीसाठी पोहचली.

मागील एक महिन्यापासून आई आणि मुलगी फेऱ्या घालत आहेत. त्यांची मंत्र्याची भेट झाली पण दोघींनीही लोकभवनच्या बाहेर येऊन स्वत:पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या दोन्ही महिलांवर उपचार सुरु आहेत. पीडित महिला गुडियाने सांगितले की, आमच्या येथील नाल्याची तक्रार ऐकून घेतली जात नाही. आम्ही अनेकदा तक्रार केली. त्यानंतर सुनावणी होत नव्हती. काही गुंड आम्हाला धमक्या देऊ लागले. त्यांनी आम्हाला मारहाणही केली. असे असूनही कारवाई झाली नाही असा आरोप तिने केला.

याबाबत एडिशनल डीसीपी चिरंजीव सिन्हा यांनी सांगितले की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही महिलांना तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीनं वाचवलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हजरतगंज पोलीसही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर पोहचले होते. मात्र या प्रकरणावरुन आता माजी मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे की, लखनऊमध्ये लोकभवनसमोर दोन महिलांनी गुंडाविरोधात कारवाई होत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, हा प्रकार दुर्दैवी आहे. समाजवादी पक्षाने लोकभवन यासाठी बनवलं होतं कारण कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. गरिबांच्या समस्या सोडवल्या जातील. मात्र भाजपा सरकारमध्ये गरीबांचे कोणीही ऐकत नाही असा आरोप त्यांनी केला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

…तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवं?; देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेकडून तोंडभरुन कौतुक

लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

 कोरोनावरील आणखी एक लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात; वैज्ञानिकांना मोठं यश

Web Title: Woman Tried To Self Immolate In Front Of Lokbhawan Lucknow in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.