शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पतीने कर्ज फेडले नाही म्हणून पत्नीला झाडाला बांधून मारहाण; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:11 IST

आंध्र प्रदेशात एका महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे.

Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या मतदारसंघात एका व्यक्तीने एका महिलेला खेचत आणत झाडाला बांधून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. महिलेवर हल्ला करणारा आरोपी हा तेलुगू देसम पार्टीचा सदस्य असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात आंध्र पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांना अटक केली आहे.

तेलुगू देसम पक्षाचा सदस्य एस माणिकप्पा याने महिलेला मुलांसमोरच झाडाला बांधून मारहाण केल्याचा आरोप आहे. शांतीपुरमच्या केंचनबल्ला येथील रहिवासी असलेल्या या महिलेवर चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम नगरपालिकेतील नारायणपुरम येथे हल्ला झाला. पीडित महिला शाळेतून तिच्या मुलाचे ट्रान्सफर सर्टिफिकेट घेण्यासाठी गावात गेली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी करवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने दोन वर्षांपूर्वी माणिकप्पा याच्याकडून ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. थोड्या थोड्या वेळाने तो पैसे देऊन माणिकप्पाचे कर्ज फेडत होता. पण काही दिवसांपूर्वी तो गाव सोडून बंगळुरूला निघून आला. तिथे तो बांधकाम मजूर म्हणून काम करू लागला. बंगळुरूला आल्यानंतर त्याने माणिकप्पाला पैसे देणे बंद केले. त्यानंतर १६ जून रोजी ती तिच्या मुलाच्या प्रवेशासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट घेण्यासाठी तिच्या गावात आली होती. त्यावेळी माणिकप्पाने तिला झाडाला बांधले आणि पैसे मागितले. यावेळी माणिकप्पाच्या मेव्हण्याने आणि पत्नीने महिलेला मारहाण केली. 

या प्रकरणात पोलिसांनी माणिकप्पा आणि त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांना अटक केली आहे. या घटनेचा व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये माणिकप्पाची पत्नी गावकऱ्यांनी रोखल्यानंतरही महिलेला मारताना दिसत आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारी