शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलीला भेटण्यासाठी सुधार गृहातून पळाली आई, ज्यालाही मागितली मदत त्याने केला रेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:58 IST

Rajasthan Crime News : विवाहितेसोबत एका आरोपीने त्याच्या रूमवर तर दुसऱ्या आरोपीने त्याच्या कारमध्ये अत्याचार केला. त्यानंतर महिलेला प्रतापनगर बस स्टॅन्डला सोडलं.

राजस्थानच्या (Rajasthan) जोधपुरमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मंडोरमधील बालिका सुधारगृहातून पळालेल्या एका विवाहित महिलेसोबत दोन लोकांनी रेप (Women Raped) केला. अधिकारी मनीष देव यांनी सांगितलं की, विवाहितेसोबत एका आरोपीने त्याच्या रूमवर तर दुसऱ्या आरोपीने त्याच्या कारमध्ये अत्याचार केला. त्यानंतर महिलेला प्रतापनगर बस स्टॅन्डला सोडलं.

या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा बालिका सुधार गृहाची संचालिकेने मंडोर पोलीस स्टेशनमध्ये महिला पळून गेल्याची तक्रार दाखल केली आणि पोलीस तिला शोधत तिच्या गावी गेले. तेव्हा महिलेने सांगितलं की, तिच्यासोबत दोन लोकांनी रेप केला. पोलिसांनी नंतर महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले जिथे जिथे ती गेली होती.

पोलिसांनी यादरम्यान काही पुरावे सापडले आणि त्यांच्या आधारे त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. कसून चौकशी केल्यावर दोन्ही आरोपींनी अपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना दोन दिवसांच्या रिमांडवर पाठवलं आहे. 

एसीपी मंडोर राजेंद्र दिवाकर म्हणाले की, बालिका गृहातून पळून गेलेल्या महिलेला रात्री सोलनपूर रानेरी येथील कुलदीप बिश्नोई भेटला, त्याला तिने बस स्टॅन्ड जाण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर तो तिला बाइकवर बसवून आपल्या रूमवर घेऊन गेला, जिथे त्याने तिच्यासोबत दुष्कर्म केलं. नंतर त्याने तिला मंडोरजवळ सोडलं.

इथे महिलेला बाबूराम जाट कार ड्रायव्हर भेटला. महिलेने त्यालाही बस स्टॅन्डला जाण्यासाठी मदत मागितली तर त्याने तिला कारमध्ये बसवलं आणि एका अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यासोबत दुष्कर्म केलं. नंतर त्याने महिलेला प्रतापनगर बस स्टॅन्डला सोडलं. तिथून महिला तिच्या गावी गेली.

पोलिसांनी एक टीम महिलेला पकडण्यासाठी तिच्या गावी गेली असताना महिलेने तिच्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी २३ वर्षीय कुलदीप बिश्नोई आणि २२ वर्षीय बाबूराम जाट याला अटक केली.

रिपोर्टनुसार, आपल्या नणंदेच्या हत्येप्रकरणी महिलेला गेल्यावर्षी बालिका गृहात पाठवण्यात आलं होतं. तेव्हा ती अल्पवयीन होती. तिने पोलिसांना सांगितलं की, तिला बऱ्याच दिवसांपासून वडील आणि आपल्या अडीच वर्षाच्या मुलीची खूप आठवण येत होती. ज्यामुळे ती बालिका सुधार गृहातून पळून गेली होती. पण घरी पोहोचण्याआधी तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडली.   

टॅग्स :Rajasthanराजस्थानsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी