शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधील महिला भारतीय तरुणाच्या पडली प्रेमात, अडथळा ठरणाऱ्या पतीचा असा काढला काटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 15:26 IST

Crime News: अनैतिक संबंधांच्या नादात नेपाळमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने एक अत्यंत भयानक कारस्थान रचले. तिने तिच्या पतीची हत्या करण्यासाठी आपल्याच बॉयफ्रेंडला ६० हजार रुपयांची सुपारी दिली.

पाटणा - अनैतिक संबंधांच्या नादात नेपाळमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने एक अत्यंत भयानक कारस्थान रचले. तिने तिच्या पतीची हत्या करण्यासाठी आपल्याच बॉयफ्रेंडला ६० हजार रुपयांची सुपारी दिली. मात्र मृत तरुणाच्या डायरीमधून मिळालेल्या पुराव्यांमुळे या सर्वांचे पितळ उघडे पडले आणि हे हत्याकांड उघडकीस येऊन आरोपी पकडले गेले. अनैतिक संबंधांमधून हत्येची ही घटना बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मधुबनीमधील जयनगरमध्ये गेल्या ३ सप्टेंबर रोजी एका २५ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. जयनगर ठाण्यामधील बरही गावामध्ये काही ग्रामस्थांना कमला कालव्यामध्ये या युवाकाचा मृतदेह तरंगताना दिसल्याने त्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणाची चौकशी सुरू केली. घटनास्थळी पोलिसांना एक डायरी मिलाली ज्यामध्ये नेपाळी नंबर लिहिलेला होता. डायरीमधून मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर जयनगर पोलिसांनी या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केला. त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एएसपी डॉ. शौर्य सुमन यांनी सांगितले की, मृत दु:खहरण महरा हा नेपाळचा नागरिक होता. त्याची पत्नी हरिहर देवी हिचे जयनगरमधील मुकेश यादव नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून या नेपाळी दाम्पत्यामध्ये सतत वाद होत असत. अखेरीस हरिहर देवी हिने पतीची हत्या करण्याचे कारस्थान रचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरिहर देवी हिने पूर्ण योजनाबद्धरीतीने आपल्या पतीला जयनगर येथे आणले. त्यानंतर तिने तिचा बॉयफ्रेंड मुकेश यादव याला ६० हजार रुपये देऊन पतीची हत्या घडवून आणली.

मिळालेल्या माहितीनुसार मुकेश यादव याने आपले मित्र सरोजसोबत मिळून धारदार हत्याराने दु:खहरण महरा याची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी मुकेश यादव जयनगर येथील डॉ. ए.पी. सिंह यांच्या क्लिनिकमध्ये नोकरी करत होता. यादरम्यान, क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी नेपाळमधून आलेल्या हरिहर देवी या महिलेशी त्याची मैत्री झाली. या दोघांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. दोघांच्या फोन कॉल्स डिटेल्सवरून हरिहर देवी ही जयनगरमधील सेलीबेली परिसरात मुकेशसोबत रात्रीची थांबत असल्याचे उघड झाले, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अनैतिक संबंधांमुळे पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या पत्नीला नेपाळ पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तसेच तिच्या बॉयफ्रेंडचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारBiharबिहार