शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"प्लीज आई-बाबांना समजव, हे पाऊल नाईलाजाने उचलतेय"; भावाला ऑडिओ मेसेज करून 'तिची' आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:19 IST

Crime News : विवाहितेने आत्महत्येपूर्वी आपल्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. त्यामध्ये तिने आपल्या मनातील दु:ख सांगितलं आहे.

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी पतीकडून केला जाणारा छळ आणि मारहाण सहन न झाल्याने एका विवाहितेने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने आत्महत्येपूर्वी आपल्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. त्यामध्ये तिने आपल्या मनातील दु:ख सांगितलं आहे. तसेच आत्महत्या करण्याच्या निर्णयाबद्दल आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने ऑडिओमध्ये आपल्या भावाला सासरच्या लोकांवर कोणतीही कारवाई करू नका असंही सांगितलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये जलनपूर येथे एका आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विवाहितेने जीव देण्यापूर्वी तिच्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. यामध्ये तिने आपली व्यथा मांडली. पूजाचे वडील ओमप्रकाश यांनी हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. यानंतर पोलिसांनी पूजाच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. 

सासरी हुंड्याची मागणी केली जात असल्याचा आरोप

बिजनौर येथील रहिवासी असलेल्या ओमप्रकाश यांनी आपली मुलगी पूजाचे 10 महिन्यांपूर्वी जलीलपूरमधील संजीव याच्याशी लग्न लावले होते. ओमप्रकाश यांनी लेकीच्या लग्नात कारही दिली होती. लग्नाआधी ओमप्रकाश यांना सांगण्यात आले होते, की जावई संजीव रेल्वेमध्ये तिकीट पर्यवेक्षक आहे. पण लग्नानंतर तो बेरोजगार असल्याचे समजले. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पूजाच्या लग्नानंतरही तिच्या सासरी हुंड्याची मागणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. हुंड्यासाठी तिला सातत्याने त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पूजाच्या माहेरच्यांनी ती 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. 

भावाला ऑडिओ मेसेज करून 8 महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्या

पूजाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 दिवसांपूर्वी हुंड्यावरील वादानंतर ते संजीवच्या घरी त्याच्याशी बोलण्यासाठीही आले होते. तेव्हाही दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता. पूजाने आपला भाऊ राजनला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. त्यामध्ये तिने "दादा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे. पण आज मी हे पाऊल नाईलाजाने उचलत आहे. तू आपल्या आई-बाबांना समजावून सांग. माझ्या सासरच्या घरातून कोणतीही वस्तू परत घेऊ नका, एक चमचाही नाही. जेव्हा तुमची बहीणच राहणार नाही, तेव्हा त्या घराशी कसा संबंध असेल?, माझ्या सासरच्यांवरही कोणतीही कारवाई करू नका. त्यांना क्षमा करा" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू