शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 20:34 IST

दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादात एका आरोपीने शेजारच्या महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. नंदनवनमध्ये बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादात एका आरोपीने शेजारच्या महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. नंदनवनमध्ये बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली.आरती नितीन गिरडकर (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव बंडू ऊर्फ एकनाथ प्रेमराज टापरे (वय २९) आहे.बुधवार रात्री ९.३० च्या सुमारास केडीके कॉलेज मार्गावरील नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ५ मध्ये राहणारे नितीन नारायण गिरडकर (वय ४२) यांची पत्नी आरती आपली दुचाकी घराजवळ पार्क करीत असताना शेजारी राहणारा आरोपी बंडू ऊर्फ एकनाथ प्रेमराज टापरे याने आक्षेप घेत शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे वाद वाढला. आरती यांनी जशास तसे उत्तर दिल्यामुळे आरोपी बंडू टापरे याने आरती यांच्याकडे धाव घेतली. त्यांना आरोपीने चाकूने भोसकले. खांद्यावर, छातीवर, पोटावर मारून आरोपीने त्यांची निर्घृण हत्या केली. आरडाओरड ऐकून आरती यांचे पती नितीन आणि शेजारी धावले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठा थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवन पोलिसांचा ताफा पोहचला. नितीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी टापरेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

नेहमीच उडायचे खटकेनितीन गिरडकर लाऊडस्पीकरचा व्यवसाय करतात. आरोपी टापरेकडे छोटा हाथी वाहन असून ते त्याने महापालिकेत भाड्याने दिले आहे. गिरडकर आणि टापरेमध्ये किरकोळ कारणावरून नेहमीच खटके उडत होते. मात्र, प्रकरण अशा भयंकर वळणावर जाईल, असा कुणी विचारही केला नव्हता.

आरोपीला  न्यायालयात हजर करणारनंदनवन पोलिसांनी गुरुवारी आरोपी टापरे याची दिवसभर चौकशी केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्याचा पीसीआर मागितला जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून