शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

घरात घुसून महिलेची हत्या; डोंबिवलीच्या भरवस्तीतील घटना, मारेकऱ्याविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:08 AM

अनोळखी मारेकऱ्याविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली : पूर्वेकडील टिळक चौक परिसरातील आनंद शीला सोसायटीत राहणाऱ्या विजया बाविस्कर (५८) यांची घरात घुसून हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. कोणीतरी तोंड दाबल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अनोळखी मारेकऱ्याविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.विजया या घरात एकट्याच राहत होत्या. सकाळी घरकाम करणारी महिला आली असता विजया यांच्या दरवाजाला बाहेरून कडी होती. कडी उघडून महिला घरात गेली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती तिने शेजाऱ्यांना दिली. त्यांनी तत्काळ याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तोंड दाबल्याने विजया यांचा मृत्यू गुदमरून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे पोलिसांनी सांगितले.  विजया यांच्या संपर्कातील व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. विजया या ३० वर्षांपासून घटस्फोटीत असून त्यांना चार बहिणी आहेत. त्यांच्या वडिलोपार्जित जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने विजया या आनंद शिला या इमारतीत तीन ते चार वर्षांपासून भाड्याने राहात होत्या. हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदततपासाची दिशा मिळण्यासाठी आनंद शीला इमारतीच्या आजूबाजूला, दुकानांमध्ये तसेच इमारतींमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. शहरातील गजबजलेला भाग म्हणून परिचित असलेल्या टिळक चौकात असलेल्या बिल्डिंगमध्ये घडलेल्या या हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.