लखनौच्या मड़ियांव भागातील भरत नगर येथील घरात सविता या ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेचा मृतदेह तीन दिवस घरातच पडून होता. मृत शरीराचे जनावरे लचके तोडत होते. घरातून दुर्गंध आल्यानंतर शेजार्यांनी सोशल मीडियावर त्याविषयी माहिती दिली, त्यानंत बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले.वृद्ध सविता एक विधवा महिला होती. त्यांनी घरात तीन लोकांना भाड्याने खोली दिली होती. दरम्यान, पंचायत निवडणुकांमुळे भाडेकरू त्यांच्या गावी गेले आणि त्यामुळे महिला घरात एकटी होती. एका समाजसेवकाच्या मते, त्याला फोनवरून माहिती मिळाली की, घरात वृद्ध महिलेचा एकटी असताना मृत्यू झाला आहे. जेव्हा तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की मृतदेह जमिनीवर पडला होता. त्या मृतदेहाचा हात कुत्र्यांनी खाल्ला. प्रेताभोवती तीन प्राणी होते. प्रभारी निरीक्षक मड़ियांव मनोज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या कुटूंबाचा शोध लागला आहे.
तीन दिवसांपासून घरात महिला पडली होती मृत; मृतदेहाचे जनावरं लचके तोडत होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 19:50 IST
DeadBody Found in Home : घरातून दुर्गंध आल्यानंतर शेजार्यांनी सोशल मीडियावर त्याविषयी माहिती दिली, त्यानंत बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले.
तीन दिवसांपासून घरात महिला पडली होती मृत; मृतदेहाचे जनावरं लचके तोडत होती
ठळक मुद्देवृद्ध सविता एक विधवा महिला होती. त्यांनी घरात तीन लोकांना भाड्याने खोली दिली होती. दरम्यान, पंचायत निवडणुकांमुळे भाडेकरू त्यांच्या गावी गेले आणि त्यामुळे महिला घरात एकटी होती.