मुंबई: अंधेरीच्या डी एन नगर रोड परिसरात विराज इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत ५४ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. ती कुटुंबियांसोबत याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होती. मानसिक तणावात तिने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत असून डी एन नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अंधेरीत खळबळ! टेरेसवरून उडी मारून महिलेने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:42 IST