Crime News West Bengal: नाराज पतीला शोधत महिला शहरात आली; पुढे जे घडले ते भयावह...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 18:34 IST2021-10-09T17:37:47+5:302021-10-09T18:34:07+5:30
Gang Rape in West Bengal: गुरुवारच्या सकाळी वर्धमान हॉस्पिटलजवळ राज कॉलेजच्या गेटसमोर या महिलेला फुटपाथवर गंभीर अवस्थेत काही दुकानदारांनी पाहिले. त्यांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली.

Crime News West Bengal: नाराज पतीला शोधत महिला शहरात आली; पुढे जे घडले ते भयावह...
पश्चिम बंगालच्या वर्धमान शहरात एका 25 वर्षीय विवाहितेवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलेला रस्त्यावरून चालत असताना एका रिक्षात घालून जबरदस्तीने निर्मनुष्य जागी नेण्यात आले. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. महिलेवर वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
गुरुवारच्या सकाळी वर्धमान हॉस्पिटलजवळ राज कॉलेजच्या गेटसमोर या महिलेला फुटपाथवर गंभीर अवस्थेत काही दुकानदारांनी पाहिले. त्यांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली. तोवर या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने तिला वर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती केले.
जेव्हा पोलीस तिथे आले तेव्हा पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. पीडितेने सांगितले की, तिचा पती भांडण करून घर सोडून निघून गेला होता. त्याच्या शोधासाठी ती वर्धमानला आली होती. तिचा पती वर्धमानमध्ये एका फॅक्टरीमध्ये काम करतो. बुधवारी सायंकाळी ती त्याच्या शोधासाठी शहरात दाखल झाली होती. तिने पती काम करत असलेली फॅक्टरी गाठली, परंतू तो तिथे सापडला नाही. यामुळे थकून भागून ही पीडिता वर्धमान स्टेशन भागात बसली होती. तेव्हा तिथे आणखी एक महिला बसली होती. हे पाहून ती तिच्या शेजारी बसली. तेवढ्यात तिथे एक टोटो रिक्षा (ई रिक्षा) आली. त्यामध्ये 6 लोक बसले होते, ते तिला जबरदस्तीने उचलून घेऊन गेले.
शेजारी बसलेल्या महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी तिला मारहाण केली. ते लोक तिला अज्ञात स्थळी घेऊन गेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. पीडीतेने सांगितले की, त्या सहा लोकांनी तिचे आयुष्य बरबाद केले. तिला मारहाण केली. बलात्कारानंतर त्यांनी तिला चालत्या टोटोमधून बाहेर ढकलून दिले आणि पसार झाले. यात तिला गंभीर दुखापत झाली. वेदना होत असल्याने ती हॉस्पिटलला जाऊ शकली नाही.
मोठी मारहाण, शरीरावर निशान
तिला फुटपाथवरून हॉस्पिटलमध्ये आणणाऱ्या महिलांनी सांगितले की, पीडितेची हालत खूप खराब आहे. डोके, मान आणि छातीवर जागोजागी जखमा आहेत. तिच्या डोक्यावर मोठा घाव असून सूजही आली आहे. गाल आणि मानेवर खरचटले आहे. शरीराच्या अन्य अंगांवर मारहाणीचे व्रण आहेत. तिला चालताही येत नव्हते. कपडे फाटलेले होते.