शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने काकी अन् भावाला जिवंत जाळले; या घटनेमागील कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:07 IST

Woman burnt her aunt and brother alive : घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आरोपी महिलेला बेदम मारहाण केली, नंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.

पाटणा : बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील नौबतपूर पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेने तिच्या काकी  आणि भावाला जिवंत जाळल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आरोपी महिलेला बेदम मारहाण केली, नंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.काकू आणि भावाला जिवंत का जाळले?गुरुवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नौबतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करणपुरा गावात जमीन विक्रीच्या पैशांवरून झालेल्या वादात एका महिलेने तिची काकी आणि चुलत भावाला एका खोलीत बंद केले आणि त्यांना जिवंत जाळले. याची खबर मिळताच ग्रामस्थांनी कसं तरी वाचवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. ७० वर्षीय शांती देवी आणि त्यांचा मुलगा अविनाश कुमार अशी मृतांची नावे आहेत.संतप्त जमावाने आरोपी महिलेला बेदम मारहाण केलीया घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी आरोपी महिला माधुरी देवीला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी महिला माधुरी देवीची जमावाच्या तावडीतून कशी तरी सुटका केली.पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले नौबतपूर स्टेशन प्रभारी अनुराग दीपक यांनी सांगितले की, दोन्ही मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवले असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.गावातील लोकांनी सांगितले की, मृत शांती देवी हिचा तिच्या पुतणीसोबत मालमत्तेवरून वाद होता, यावरून दोघांमध्ये कडाक्याने भांडण झाले. असे सांगितले जात आहे की, आरोपी महिलेलाही तिच्या नावावर काही जमीन मिळवायची होती, परंतु मृतक त्यासाठी तयार नव्हते. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकBiharबिहारWomenमहिला