शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुलाखाली पोत्यात महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:15 IST

तेलंगणात एका गोणीमध्ये नग्नावस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Telangana Crime:तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. हैदराबादमधील किस्मतपूर पुलाखाली एका तरुणीचा नग्न मृतदेह पोत्यात सापडला. किस्मतपूर पुलाखाली एका तरुणीचा नग्न मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तिथेच टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. तरुणीवर अत्याचार करुन तिला मारण्यात आल्याचाही संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे. मृतदेहावर कपडे नसल्याने  खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. हैदराबादमधील घटनेची माहिती मिळताच राजेंद्रनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आजूबाजूच्या परिसरातून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.

पोलीस संशयितांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे तपासत आहेत. प्राथमिक तपासात अद्याप मृताची ओळख पटलेली नाही  पोलीस स्थानिक रहिवाशांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले जात आहे. एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले असून जे सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी  जर कोणाला या घटनेबाबत काही माहिती असेल तर त्यांनी त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असंही आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, पोलीस बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांची चौकशी करत आहोत. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींची कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली आहेत का याचाही तपास केला जात आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी सुगावा आणि बोटांचे ठसे गोळा करण्यात आले आहेत.

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस