शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गळ्याला हात-पाय बांधले, कचऱ्याच्या गाडीत फेकलं; लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:51 IST

बंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची हत्या करुन मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकण्यात आला होता

Bengaluru Crime: बंगळुरूमध्ये कचऱ्याच्या ट्रकमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा करत हत्येच्या आरोपाखाली लिव्ह-इन पार्टनरला अटक केली. आशा असे या महिलेचे नाव आहे, जी मोहम्मद शमसुद्दीनसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. पोलिसांनी शमसुद्दीनला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. रविवारी स्थानिकांनी कचऱ्याच्या ट्रकमध्ये मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली होती.

रविवारी बंगळुरु महानगरपालिकेच्या कचरा गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकमध्ये एक मोठी पॉलिथिन पिशवी आढळली, ज्यातून दुर्गंधी येत होती. दुर्गंधी वाढत गेल्याने लोकांनी पिशवीची तपासणी केली. पिशवीमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. पिशवीत बांधलेल्या मृतदेहाचे हात पाय गळ्याला बांधलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या मदतीने पोलीस आशाचा प्रियकर मोहम्मद शमसुद्दीनपर्यंत पोहोचले. तो मूळचा आसामचा असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमसुद्दीन गेल्या दीड वर्षांपासून ४० वर्षीय आशासोबत प्रेमसंबंधात होता. दोघेही बंगळुरूच्या हुलीमावू भागातील एका सोसायटीत भाड्याने राहत होते. दोघेही विवाहित असून विवाहित जोडप्यासारखे राहत होते.

दारू पिण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि भांडण इतके वाढले की शमसुद्दीनने आशाची हत्या केली. त्यानंतर शमसुद्दीनने आशाचा मृतदेह स्वतःच्या बाईकवरुन नेला आणि महापालिकेच्या कचरा ट्रकमध्ये टाकला. प्राथमिक तपासात आशाचा गळा दाबून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह एका पिशवीमध्ये भरून रात्री उशिरा कचरा गाडीत टाकण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयास्पद बाईक घटनास्थळाकडे जाताना दिसत होती. त्याच आधारे पोलिसांनी शमसुद्दीनला अटक केली. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस