शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Crime: "तू डाकीण आहेस..." जादूटोण्याच्या संशयावरून माय-लेकाला जिवंत जाळलं; कुठं घडली ही भयंकर घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:50 IST

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली. जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका माय-लेकाला जिवंत जाळले.

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातून मानवतेला काळीमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली. एका ३२ वर्षीय महिलेला डाकीण ठरवून जमावाने तिला तिच्या एक वर्षाच्या मुलासह जिवंत जाळले. कुमारडुंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात मंगळवारी मध्यरात्री हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. शासनाकडून अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तीचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. या मृत्युला पीडित महिलाच जबाबदार असल्याचा संशय आरोपींना होता. मंगळवारी रात्री उशिरा सुमारे डझनभर लोकांनी महिलेच्या घरावर हल्ला केला. जमावाने महिलेवर जादूटोण्याचा आरोप करत तिला घेरले. महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, यावेळी तिच्या कडेवर तिचा एक वर्षाचा मुलगा होता. दोघांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला.

हल्ल्यात पीडितेचा पतीही जखमी झाला आहे, मात्र तो वेळीच तिथून निसटल्याने त्याचा जीव वाचला. त्याने रात्र नातेवाईकाकडे काढल्यानंतर बुधवारी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जगन्नाथपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राफेल मुर्मू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीवर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  याप्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Woman and baby burned alive over witchcraft suspicion in Jharkhand.

Web Summary : In Jharkhand, a woman and her one-year-old child were burned alive by a mob accusing her of witchcraft. Her husband escaped and reported the crime. Police have arrested four suspects and are investigating the horrific incident.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड