शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विप्रो हत्या व बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशी तुर्तास टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:04 PM

आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मुंबई - पुण्याच्या विप्रो कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरविलेल्या दोघांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी २४ जून रोजी करायची की नाही, याचा निर्णय उच्च न्यायालय शुक्रवारी घेण्याची शक्यता होती. मात्र, विप्रो बलात्कार आणि खूनप्रकरणी पुणे कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली असून आरोपींची फाशी तुर्तास टळली आहे. त्यामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. पुरुषोत्तम बोराटे, प्रदीप कोकडे यांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर शिक्षेवर अंमलबजावणी करण्यास कारागृह प्रशासनाने चार वर्षांचा विलंब केला. शिक्षेचे वॉरंट कधीही येऊ शकते, असा विचार करत चार वर्षे सतत मृत्यूच्या छायेत जगलो, असे याचिकेत नमूद आहे.विलंब आपल्याकडून झाला नाही, असे सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले. तर, याचिका फेटाळतानाच्या टिप्पणीची कागदपत्रे सरकारी वकिलांनी ऐनवेळी दिल्याचे सांगत याचिकाकर्त्यांचे वकील युग चौधरी यांनी कागदपत्रांचा अभ्यासासाठी शिक्षेच्या अंमलबजावणीस स्थगिती द्यावी, अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला होता. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDeathमृत्यूCourtन्यायालयRapeबलात्कारPoliceपोलिसMurderखून