खबरदार! मुलीला डोळा मारणे अन् फ्लाईंग किस करणेही लैंगिक छळ; कोर्टाने सुनावली १ वर्षाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 01:38 PM2021-04-11T13:38:38+5:302021-04-11T13:39:03+5:30

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ज्या तरूणाविरोधात ही तक्रार होती. त्याला अटक केली. तेव्हापासून ही तरूण पोलीस कोठडीत आहे.

Winking and kissing a girl is also sexual harassment; The court sentenced him to 1 year | खबरदार! मुलीला डोळा मारणे अन् फ्लाईंग किस करणेही लैंगिक छळ; कोर्टाने सुनावली १ वर्षाची शिक्षा

खबरदार! मुलीला डोळा मारणे अन् फ्लाईंग किस करणेही लैंगिक छळ; कोर्टाने सुनावली १ वर्षाची शिक्षा

googlenewsNext

मुंबई – शहरात एका २० वर्षाच्या तरूणाने अल्पवयीन मुलीला डोळा मारणे आणि फ्लाईंग किस केल्याच्या आरोपाखाली १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेसेंस कायद्यातंर्गत सुनावण्यात आली आहे.

२९ फेब्रुवारी २०२० रोजी १४ वर्षाच्या मुलीने तिच्या आईला सांगितले की, एका मुलाने तिला डोळा मारला तसेच फ्लाईंग किस केली. यावरून पीडित मुलीच्या घरच्यांनी एलटी मार्ग पोलीस स्टेशनला लैंगिक छळ केल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ज्या तरूणाविरोधात ही तक्रार होती. त्याला अटक केली. तेव्हापासून ही तरूण पोलीस कोठडीत आहे.

या तरूणाने कोर्टात दावा केला की, मुलीच्या आईने मी वेगळ्या जातीचा असल्याने मुलीशी बोलण्यापासून रोखलं होतं. तसेच तिच्या नातेवाईकांमध्ये तिने मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याबाबत चॅलेंज केले होते असा तरूणाने सांगितले. सुनावणीवेळी मुलगी, तिची आई आणि तपास अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध करण्यात आला.

साक्षीदारांच्या जबाबानंतर तरूण दोषी आढळला. त्यावेळी कोर्टानं सांगितले की, आरोपीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्याला १ वर्षाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तक्रारीनुसार डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे हा लैंगिक इशारा आहे. त्यामुळे पीडित तरूणीचा लैंगिक छळ झाला आहे असं कोर्टाने सांगितले.

Web Title: Winking and kissing a girl is also sexual harassment; The court sentenced him to 1 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.