ट्रेनमध्ये विंडो सीटदेखील धोकादायक! तरुणाच्या मानेत सळी घुसली; जागेवरच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:57 IST2022-12-02T15:56:42+5:302022-12-02T15:57:51+5:30
दिल्लीहून कानपूरला जाणाऱ्या नीलांचल एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. विंडो सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या मानेत लोखंडी सळी घुसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

ट्रेनमध्ये विंडो सीटदेखील धोकादायक! तरुणाच्या मानेत सळी घुसली; जागेवरच मृत्यू
ट्रेनमध्ये विंडो सीटसाठी सारेच धडपडत असतात. विंडो सीट मिळावी म्हणून आरक्षण करताना किंवा अनारक्षित डब्यांमध्ये देखील मारामारी सुरु असते. हीच विंडो सीट जिवावर बेतू शकते. हा धक्कादायक प्रकार दिल्लीहून कानपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये घडला आहे.
दिल्लीहून कानपूरला जाणाऱ्या नीलांचल एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. विंडो सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या मानेत लोखंडी सळी घुसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. सोमना आणि डांबर रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. यामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. अलीगढ रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा मृतदेह खाली उतरविण्यात आला.
सुल्तानपुरच्या प्रवाशाचा मृत्यू जाला आहे. घटनेनंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावर रेल्वे ट्रॅकचे काम सुरु होते. यावेळी ट्रेनच्या चाकाखाली सळी आली आणि ती उडाली. ही सळी खिडकी तोडून आतमध्ये घुसली. खिडकीवर तरुण बसला होता. त्याच्या मानेत ती घुसल्याने जागेवरच त्याने प्राण सोडले.