शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

विजय मल्ल्या, नीरव मोदी यांची रवानगी होणार तळोजा कारागृहात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 19:05 IST

व्हीआयपी आरोपींसाठी तळोजा जेलमध्ये जागा निश्चित

ठळक मुद्देभारताला पाहिजे असलेले आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे भारतात प्रत्यापर्ण झाल्यास त्यांनाही तळोजा जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं.मुंबईत फक्त तळोजा कारागृहातच मोकळी जागा उपलब्ध असल्याने या विशेष कारागृहासाठी तळोजा कारागृहात पाहणी करण्यात आली आहे.

आर्थिक घोटाळ्यांमध्ये अडकलेले आरोपी हे उच्चभ्रू असल्याने या आरोपींना इतर सराईत गुन्हेगारांसोबत कारागृहात ठेवणं धोकादायक असल्यामुळेच अशा व्हीआयपी आरोपींसाठी विशेष कारागृह बनविण्याची मागणी कारागृह प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यानंतर या विशेष कारागृहासाठी नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशात पळून गेलेले आणि भारताला पाहिजे असलेले आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे भारतात प्रत्यापर्ण झाल्यास त्यांनाही तळोजा जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं.पीएनबी बँकेची १३ हजार कोटी रुपयांना फसवणूक करून भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला भारतात आणण्याचे तपास यंत्रणांनी सर्व प्रयत्न सुरू आहेत. लंडनच्या वेस्टमिन्स्टरच्या कोर्टाने त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली असली तरी लंडनमधून आलेल्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ठेवण्यात येणाऱ्या आर्थर रोड कारागृहाची पाहणी केल्यानंतर कारागृहातील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. कुख्यात गुंड अबू सालेमनेही मुंबईतील कारागृह व्यवस्थेबाबत पोर्तुगाल सरकारचं लक्ष वेधलं होते. लंडनमधील कारागृहातील आरोपींना व्यायामासाठी आणि मनोरंजनासाठी ठराविक वेळेत बाहेर येण्याची परवानगी मिळते. त्याला स्वच्छ पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालय आणि कपडे धुण्याची सुविधा मिळते. नियमीत सुनावणीसाठी व्हिडिओ काॅन्फरसिंगची देखील सुविधा आहे. ही बराक अत्यंत सुरक्षित असल्याने तसंच बराकीबाहेर प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात असल्याने आरोपीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, असं लंडन प्रशासनाने नीरव मोदी प्रकरणात आर्थर रोड कारागृहाला पाठवलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं.दरम्यान, विजय मल्ल्यासह नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिल्यास त्याला कुठल्या तुरूंगात ठेवण्यात येईल, त्या तुरुंगात काय सुविधा असतील याची माहिती लंडन कोर्टाने मागवली होती. आर्थर रोड कारागृहातील या खोलीचा आकार २५ बाय १५ फूट एवढा असून इतर खोल्यांच्या तुलनेत या खोलीचा आकार मोठा आहे. या खोलीत ३ पंखे ६ ट्युबलाईट असून खोलीला २ खिडक्याही आहेत. त्यानुसार ही खोली प्रकाशमान आणि हवेशीर आहे. कैद्याला आपलं खासगी सामान ठेवण्यासाठी खोलीत स्टोरेजची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचं कळवलं होतं. मात्र, लंडन प्रशासनाकडून त्यातही अनेक त्रुटी काढल्या होत्या. या माहितीनंतर आर्थिक घोटाळ्यातील आरोपींसाठी स्वतंत्र कारागृह बांधण्यात येण्याबाबतच्या प्रस्तावाकडे गृह विभागाने लक्ष वेधलं. त्यानुसार मुंबईत फक्त तळोजा कारागृहातच मोकळी जागा उपलब्ध असल्याने या विशेष कारागृहासाठी तळोजा कारागृहात पाहणी करण्यात आली आहे.लंडनमधील कारागृहांची रचना कशा प्रकारे आहे, व्हीआयपी आरोपींंची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे, काय काय सुविधा तेथील कारागृहातील आरोपींना दिल्या जातात, याची पाहणी करण्यासाठी लवकरच कारागृह आणि गृह प्रशासनातील अधिकारी लंडनला भेट देणार आहेत. त्यानुसार कारागृहांची बांधणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

टॅग्स :jailतुरुंगNirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNavi Mumbaiनवी मुंबई