शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:04 IST

राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज सिंह कुशवाहा अजूनही सत्य लपवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मेघालयमधील सोहरा येथे झालेल्या इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज सिंह कुशवाहा अजूनही सत्य लपवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात नार्को चाचणी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

पोलिसांचा स्पष्ट नकारपूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सिम यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी सध्या तपासात सहकार्य करत असून, त्यांच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे नार्को चाचणीची गरज भासणार नाही. शिवाय, भारतात नार्को चाचणीची वैधता न्यायालयीन प्रक्रियेत स्वीकारली जात नाही."

कुटुंबीयांची नार्को टेस्टची मागणीराजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी मात्र आरोपींकडून संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी नार्को टेस्टची मागणी केली आहे. राजाचा भाऊ सचिन रघुवंशी म्हणाला की, "आम्हाला खात्री आहे की सोनम आणि इतर आरोपी अजूनही अनेक गोष्टी लपवत आहेत. आम्हाला असेही वाटते की या हत्येमध्ये इतर लोकांचाही सहभाग असू शकतो."

हत्या आणि अटकसोनमवर तिचा प्रियकर राज सिंह कुशवाहा आणि आणखी तीन भाडोत्री गुन्हेगारांच्या मदतीने आपल्या नवविवाहित पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. हे कृत्य हनीमूनदरम्यान २३ मे रोजी मेघालयातील सोहरा भागात घडले. नंतर २ जून रोजी वेसाडोंग फॉल्सजवळ एका खोल खड्ड्यात राजाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या होत्या आणि घटनास्थळाजवळून रक्ताने माखलेले शस्त्रही सापडले.

अटक व चौकशीमेघालय पोलिसांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने सोनमसह राज सिंह कुशवाहा, आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी यांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सध्या शिलाँगमध्ये पोलीस कोठडीत असून, त्यांची चौकशी सुरू आहे. शिलाँग न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजा आणि सोनम यांचा विवाह ११ मे रोजी इंदूरमध्ये पार पडला होता. अवघ्या काही दिवसांतच म्हणजे २० मे रोजी दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले. त्यानंतर २३ मे रोजी ते दोघे अचानक बेपत्ता झाले आणि नंतर घडलेल्या घटनांनी सर्वांना हादरवून सोडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार