Aryan ShahRukh khan Drug Case: आर्यन खानला जामिन मिळणार? शाहरुख खान उच्च न्यायालयात येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:44 IST2021-10-27T15:41:39+5:302021-10-27T15:44:19+5:30
Aryan khan Drug Case LIVE Updates: काल हायकोर्टात गोंधळ उडाला होता. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. आज शाहरुख खान येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Aryan ShahRukh khan Drug Case: आर्यन खानला जामिन मिळणार? शाहरुख खान उच्च न्यायालयात येण्याची शक्यता
जसजशी मुंबई हाय कोर्टात आर्यन खानची सुनावणीची तारीख जवळ येत गेली तसतशी मुंबईत मोठमोठ्या घडामोडी घडत गेल्या आहेत. आर्यन खानच्या (Aryan Khan) चौकशीसाठी त्याला चारदा जामिन नाकारायला लावलेल्या एनसीबीच्या समीर वानखेडेंच्या मागेच चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अशातच आज आर्यन खानच्या जामिनावर दुसऱ्या दिवशीची सुनावणी थोड्याच वेळात सुरु होणार आहे.
आर्यन खानला अटक झाल्यापासून कुठेही न दिसलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) काही दिवसांपूर्वी त्याला भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात गेला होता. आता आज तो आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीला हाय कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
काल काय घडले...
आर्यन खानला सोडविण्यासाठी माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची मोठी टीम कार्यरत आहे. एनसीबीकडून आर्यन खानला जामिन का मिळू नये, यावर बाजू मांडली जात आहे. यावेळी एनसीबीने पूजा ददलानीचे नाव घेतले आहे. प्रभाकरच्या अॅफिडेव्हिटमुळे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचे नाव जोडले गेले आहे. यामुळे पूजा ददलानीने तपासावेळी साक्षीदारांना प्रभावित केले आहे. साक्षीदारांना अशाप्रकारे फोडले जात असल्याने आर्यन खानचा जामिन रद्द करण्यासाठी एक महत्वाची बाब म्हणून पहावे, असे एनसीबीच्या वकिलांनी म्हटले आहे.
हायकोर्टात गोंधळ उडाला होता. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. कोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढले यानंतर पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला आणि सुनावणी पुढे सुरु झाली. यावेळी रोहतगी यांनी आर्यन खान हा त्या पार्टीत पाहुणा म्हणून गेला होता, असे म्हटले आहे. आता आज यापुढील सुनावणी सुरु होणार आहे.