शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:09 IST

नवविवाहित वधू घेऊन निघालेला हरियाणातील प्रीथला गावचा रहिवासी पवन कुमार याच्या गाडीला राष्ट्रीय महामार्ग-२१९ वरील गेहुआनवा नदीजवळ काही दरोडेखोरांनी अडवले अन्...

‘सप्तपदी’नंतर आयुष्यभराचा जोडीदार सोबत घेऊन निघालेल्या एका वराला असा काही अनुभव आला, की त्याच्या पैशांसोबत वधूही फुर्र झाली. ही घटना बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील चैनपूर येथील असून, एक नवरदेव ‘लुटेरी दुल्हन’ टोळीच्या जाळ्यात कसा अडकला, याचे हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

गुरुवारी दुपारी, नवविवाहित वधू घेऊन निघालेला हरियाणातील प्रीथला गावचा रहिवासी पवन कुमार याच्या गाडीला राष्ट्रीय महामार्ग-२१९ वरील गेहुआनवा नदीजवळ काही दरोडेखोरांनी अडवले. त्यांनी केवळ वराकडील दागिने आणि रोख रक्कम लुटली नाही, तर वधूलाही दुचाकीवरून सोबत घेऊन पळ काढला.

फसवणुकीचा कट कसा रचला गेला?या घटनेनंतर जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा पवन कुमारला मोठा धक्का बसला. त्याने चौकशी केली असता, त्याला कळले की तो एका ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा बळी ठरला आहे. या टोळीने मुलीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पवनाकडून आधीच १.१० लाख रुपये उकळले होते. वराचा भाऊ सुरेश याने तात्काळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

सुरेशने दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी चैनपूर पोलीस स्टेशन परिसरातील खारीगव्हाण येथे हे लग्न ठरले होते. फोनवरून एका मुलीसोबत हे लग्न जुळवण्यात आले होते. लग्नासाठी वधूचे कपडे, मेकअपचे साहित्य, मिठाई आणि दागिने हरियाणातून खास आणण्यात आले होते.

लग्नानंतर तासाभरातच घातलग्नसोहळा सुरू होण्यापूर्वी, मुलीच्या कुटुंबीयांनी १.१० लाख रुपये घेतले. त्यानंतर वराच्या बाजूने दागिने आणि इतर वस्तू वधूला भेट म्हणून दिल्या गेल्या. यानंतर अवघ्या एका तासात लग्न आटोपले. मुलीच्या बाजूने एका ऑटोची व्यवस्था करण्यात आली आणि नवदाम्पत्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनकडे पाठवले गेले. मात्र, तीन किलोमीटरचे अंतर पार करताच दरोडेखोरांनी त्यांना लुटले आणि वधूला घेऊन पळ काढला.

या घटनेने ‘लुटेरी दुल्हन’ टोळ्यांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. लग्नाच्या पवित्र बंधनाआड चालणाऱ्या या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार