शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची गळा आवळून हत्या ; आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 09:46 IST

निवृत्ती बाळाजी सोळंकी हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करायचा.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील कोलारा येथे १९ मेच्या सकाळी उघडकीस आली आहे. पार्वती निवृत्ती सोळंकी (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.निवृत्ती बाळाजी सोळंकीहा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करायचा. १८ मे रोजी गावातील नानमुखाचा कार्यक्रम असल्यामुळे पार्वती सोळंकी तिथे आपल्या मुला समवेत स्वयंपाकासाठी गेल्या होत्या. सायंकाळी त्या जेवण करून परत आल्या होत्या. निवृत्तीही तेथूनच जेवण करून आला होता. मात्र रात्री त्याने नानमुखाच्या कार्यक्रमाला मला न विचारता का गेली, अशी विचारणा सुरू केली. सोबतच पत्नीस वायरने मारहाण केली. लहान मुलाने मध्यस्थी करून भांडण सोडविले. मात्र निवृत्तीने भांडण सुरच ठेवल्याने रात्री गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किसन सोळंकी यांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांना समजावून सांगत वाद मिटवला. मोठा मुलगा रामेश्वर हा काही महिन्यापासून आतेबहिणीकडे गेलेला असल्याने सासू सुभद्रा या आपल्या लेकीकडे गेलेल्या असल्याने घरात पती-पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघेच जण होते. दरम्यान रात्री मुलगा झोपी गेल्यानंतर निवृत्तीने पत्नीचा वायरच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. सकाळी आई उठत नसल्याचे पाहून मुलाने शेजारच्यांना बोलावून आणेले तेव्हा पार्वती मृत्यू पावल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळालनंतर पोलिसांनी लगोलग घटनास्थळ गाठून पंचनामा करत आरोपी निवृत्ती सोळंकी यास अटक केली. विठोबा साहेबराव परीहार (भालगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निवृत्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास चिखली पोलिस करत आहे.यापूर्वीही पोलिसांत दाखल झाली होती तक्रार या प्रकरणातील मृत महिलेचा पती निवृत्ती सोळंकी यास दारूचे व्यसन आहे. तसेच तो चारित्र्याच्या संशयावरून नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करायचा. गत ५ फेब्रुवारी २०२० रोजी देखील त्याने मारहाण, शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मृत महिलेच्या भावाने पोलीसांत तक्रार दाखल करून बहीणीला माहेरी नेले होते. मात्र, त्यावेळी पुन्हा त्रास देणार नाही असे सांगून आरोपीने घरी परत नेले होते. मृत महिलेला दोन मुले व एक १९ वर्षांची मुलगी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी