शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चला गाव फिरून येऊ! पत्नीचा हट्ट पुरवणं पडलं महागात; प्रवासादरम्यान पती झोपताच नवविवाहिता फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 20:56 IST

सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केलेली तरुण रेल्वेतून उतरून फरार; पोलिसांकडून शोध सुरू

बलिया: उत्तर प्रदेशाच्या बलिया जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेली एक तरुणी पळून गेली आहे. पती ट्रेन प्रवासादरम्यान झोपला असताना पत्नी ट्रेनमधून उतरली. तिनं एका रिक्षा चालकाकडून फोन घेतला आणि एका व्यक्तीला बोलावून त्याच्यासोबत पळून गेली. 

बलिया रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर पती झोपेतून उठला. त्यावेळी त्याला पत्नी दिसली नाही. पत्नी सुरेमनपूर रेल्वे स्थानकात उतरल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानं सुरेमनपूर गाठलं. पत्नी एका तरुणासोबत पळून गेल्याची माहिती त्याला एका रिक्षा चालकानं दिली. पत्नीनं रिक्षा चालकाच्या फोनवरून पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालकाच्या मोबाईलवरून डायल करण्यात आलेला नंबर पत्नी ज्याच्यासोबत पळाली, त्या तरुणाचा होता. त्यानं एक-दोनदा फोन उचलला. मात्र त्यानंतर कॉल  डायव्हर्ट होऊ लागला. 

सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाल्यानंतर पत्नी पळून गेल्यानं पती चिंतेत सापडला. पत्नीच्या शोधासाठी तो परिसरात भटकला. अखेर त्यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित पती बलिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचं कुटुंब पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये वास्तव्यास आहे. त्याची पत्नी मूळची बिहारच्या गया जिल्ह्याची आहे. तिचं कुटुंबदेखील आसनसोलमध्ये वास्तव्यास आहे. दोघांनी डिसेंबरमध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला. तेव्हापासून दोघे सोबत राहत होते. या लग्नामुळे तरुणीचे नातेवाईक नाराज होते.

बलियामधील गाव फिरण्यासाठी दोघे सियालदह एक्स्प्रेसनं निघाले होते. सुरेमनपूर येण्यापूर्वी पतीला झोप आली. बलिया स्थानक येताच त्याला जाग आली. मात्र पत्नी कुठेच दिसत नव्हती. त्यानं सहप्रवाशांकडे याबद्दल विचारणा केली असता पत्नी सुरेमनपूरला उतरल्याचं त्याला समजलं. यामुळे त्रस्त झालेल्या पतीनं लगेच सुरेमनपूर गाठलं. आता पोलीस बेपत्ती पत्नीचा शोध घेत आहेत.