शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मॉर्निंग वॉकचा बहाणा करून पत्नीने केला पतीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 21:58 IST

गुन्हे शाखा युनिट पाचने केला गुन्हा उघड

ठळक मुद्देमॉर्निंग वॉक व सायकलिंगला गेल्याचा बहाणा करून संबंधित युवकाच्या पत्नीने खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा युनिट पाचने हा गुन्हा उघड केला आहे. रात्रभर नवरा झोपला असताना त्याला संपविण्याबाबत अनेकदा विचार केला. शेवटी तिने सकाळी नेहमीप्रमाणे शेजारीण व लहान मुले यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यावर मयूर हा झोपेत असताना त्याच्या डोक्यामध्ये फावडे घातले.

देहूरोड : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामुर्डीत मंगळवारी सकाळी एका युवकाचा डोक्यात व गळ्यावर फावड्याने वार करून खून करण्यात आला होता. यामध्ये मॉर्निंग वॉक व सायकलिंगला गेल्याचा बहाणा करून संबंधित युवकाच्या पत्नीने खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा युनिट पाचने हा गुन्हा उघड केला आहे.

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामुर्डी गावामध्ये मयूर गोविंद गायकवाड यांच्या डोक्यामध्ये व गळ्यावर फावड्याने वार करून ठार करण्यात आले होते. सदर घटनेबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांनी भेट दिली होती.  

देहूरोड येथील गुन्हे शाखा, युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, स्वामीनाथ जाधव यांच्या तपास पथकाने मयताची पत्नी ऋतू मयूर गायकवाड (वय २०, रा. भैरोबा मंदिरामागे, मामुर्डी, देहूरोड) हिला विश्वासामध्ये घेऊन  सखोल तपास केला.त्यावेळी तिने नवºयाकडून नेहमीच लैंगिक छळ होत होता. सदर त्रासाबाबत तिने अनेकदा सासू, सासरचे नातेवाईक तसेच आईवडील यांना सांगितले होते. तरीही काही मार्ग न निघाल्याने सदर त्रासातून सुटण्याकरिता पतीला संपवणे, हाच एक मार्ग तिला वाटत होता. त्यानुसार ४ दिवसांपासून प्लॅन करून तिने शेजारी राहणारी एक महिला व काही लहान मुलांसोबत मॉर्निंग वॉकला जाणे सुरू केले. ती नवरा एकटा घरी असण्याची वाट पाहू लागली. सोमवारी (दि. २८) तिच्या सासूला रात्रपाळी ड्यूटीकरिता जावे लागले व तिचा दीर हा घरी येणार नव्हता, याची माहिती तिला होती. पती मयूर याने रात्री उशिरा अकराच्या सुमारास दारू पिऊन जेवण केले. तो पूर्ण नशेमध्ये होता.

रात्रभर नवरा झोपला असताना त्याला संपविण्याबाबत अनेकदा विचार केला. शेवटी तिने सकाळी नेहमीप्रमाणे शेजारीण व लहान मुले यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यावर मयूर हा झोपेत असताना त्याच्या डोक्यामध्ये फावडे घातले. पतीला मारताना तिच्या जिन्स पॅन्टवर उडालेले रक्त तिने पाण्याने साफ करून पुन्हा त्याच लहान मुलांसोबत सायकलिंग करण्याकरिता गेली. तसेच, परत आल्यावर आपण घरी नसताना अज्ञात व्यक्तींनी पतीची हत्या केल्याचा बनाव केला. सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, धनराज किरनाळे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, सावन राठोड, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, गणेश मालुसरे व राजेंद्र कदम यांनी केली आहे.

टॅग्स :MurderखूनPuneपुणेPoliceपोलिसArrestअटक