पतीला सोडून अविवाहित तरूणीच्या प्रेमात पडली महिला, म्हणाली - आता काही झालं तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 15:51 IST2023-06-28T15:50:35+5:302023-06-28T15:51:26+5:30

विवाहित महिलेने स्पष्ट सांगितलं की, तिला पतीसोबत रहायचं नाही. ती म्हणाली की, तिला आयुष्यभर तिच्या मैत्रिणीसोबत रहायचं आहे.

Wife left husband after 2 months of marriage to live with unmarried girl | पतीला सोडून अविवाहित तरूणीच्या प्रेमात पडली महिला, म्हणाली - आता काही झालं तरी...

पतीला सोडून अविवाहित तरूणीच्या प्रेमात पडली महिला, म्हणाली - आता काही झालं तरी...

Bihar : दोन तरूणी एकमेकींच्या प्रेमात असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. पण बिहारच्या जुमईमधून एक विवाहित महिला एका अविवाहित तरूणीच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. विवाहित महिलेच्या पतीने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी दोघींना धनबादमधून ताब्यात घेतलं. यावेळी विवाहित महिलेने स्पष्ट सांगितलं की, तिला पतीसोबत रहायचं नाही. ती म्हणाली की, तिला आयुष्यभर तिच्या मैत्रिणीसोबत रहायचं आहे. तसेच अविवाहित तरूणी सुद्धा म्हणाली की, काहीही झालं तरी दोघींना सोबत रहायचं आहे.

मुबारकपूरच्या करिश्माचं लग्न झाझा येथील संदीप कुमारसोबत यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालं होतं. पण लग्नाच्या दोनच महिन्यानंतर करिश्मा जमुईच्या एका हॉटेलमधून मैत्रीण राखीसोबत फरार झाली होती. ज्यानंतर करिश्माच्या पतीने पोलिसात राखी विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. 

यानंतर  पोलिसांनी दोघींनाही धनबादमधून ताब्यात घेतलं होतं. करिश्मा आणि राखी दोघींचीही वयं 23 असल्याचं सांगण्यात आलं. करिश्मा आधी धनबादमध्ये राहत होती. इथे एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना तिची ओळख राखीसोबत झाली होती. तेव्हापासून त्या चांगल्या मैत्रिणी झाल्या.

विवाहित महिला करिश्मा म्हणाली की, तिचा पती तिच्यावर अत्याचार करतो, ज्यावर नाराज होऊ ती राखीसोबत निघून गेली होती. आता दोघींनाही आयुष्यभर सोबत रहायचं आहे. राखी म्हणाली की, कुणी काहीही बोललं तरी त्यांना सोबत रहायचं आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलं की, पतीच्या सूचनेनंतर गुन्हा दाखल करत विवाहित महिला आणि तिच्या मैत्रिणीला धनबादहून ताब्यात घेतलं. महिलेला कोर्टासमोर हजर केलं जाईल. सध्या महिला तिच्या मर्जीने तिच्या मैत्रिणीसोबत गेली आहे. 

Web Title: Wife left husband after 2 months of marriage to live with unmarried girl