पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारून घेतला त्याचा जीव, लग्नात नाचण्यावरून झाला होता वाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 09:48 AM2021-03-20T09:48:13+5:302021-03-20T09:52:01+5:30

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना डिंडोरी जिल्ह्यातील घुघरी गावातील आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या बुधवारी एका लग्नात नाचण्यावरून वाद झाला होता.

Wife kick on husband genital parts killed him in Dindori MP after dispute on dance in marriage | पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारून घेतला त्याचा जीव, लग्नात नाचण्यावरून झाला होता वाद!

पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारून घेतला त्याचा जीव, लग्नात नाचण्यावरून झाला होता वाद!

Next

मध्य प्रदेशच्या डिंडोरी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने शुल्लक कारणावरून तिच्या पतीचा जीव घेतला. पती-पत्नीमध्ये काही कारणाने वाद झाला होता आणि पत्नीने रागात आपल्या पतीच्या गुप्तांगावर लाथ मारली. पती जखमी आणि नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
नाचण्यावरून झाला होता वाद

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना डिंडोरी जिल्ह्यातील घुघरी गावातील आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या बुधवारी एका लग्नात नाचण्यावरून वाद झाला होता. लग्नाहून परतत असताना दोघांमधील वाद आणखी वाढला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारली. लाथ इतकी जोरात मारली की, पती गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान गुरूवारी त्याचा मृत्यू झाला. (हे पण वाचा : धर्म परिवर्तन करून १५ वर्षांच्या मुलीशी केला जात होता निकाह; महिला आयोगानं ऐनवेळी छापा मारताच....)

या घटनेची माहिती मिळताच समनापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी उमा शंकर यादव, एएसआय अरूण पटेल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहे. (हे पण वाचा  :  हॉस्पिटलच्या शवागारात बॉयफ्रेन्डचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आली गर्लफ्रेन्ड, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल!)

वाचा : 

दरम्यान, अशाप्रकारची घटना याआधीही झाली आहे. शिवपुरी भागात काही दिवसांपूर्वीच एका महिलेने तिच्या पतीच्या गुप्तांगावर लाथ मारली होती. ज्यात पती गंभीर रूपाने जखमी झाला होता. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात केस दाखल केली होती.
 

Web Title: Wife kick on husband genital parts killed him in Dindori MP after dispute on dance in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.