शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंधातून पत्नीने केली पतीची चाकू भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 17:56 IST

मृत पतीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला होता.

ठळक मुद्देपत्नीने हत्या केल्याचा गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी तिला अटक केले आहे. तपासात पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर पत्नीने हत्या केल्याचे कबूल केले

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर परिसरातील एका इमारतीमध्ये ३६ वर्षीय पतीची दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीने चाकूच्या साहयाने हत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे बंद घरात आई, वडील, आजी, बायको व दोन्ही मुली घरात झोपलेले असताना ही हत्या झाली आहे. यामुळे पोलिसांना प्रश्न पडला होता. पोलिसांनी घरातील सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. शेवटी पत्नीने हत्या केल्याचा गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी तिला अटक केले आहे. मृत पतीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला होता.नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर परिसरातील ओम तुलसी अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी/02 मध्ये सुनील आनंदा कदम (३६) याचे त्याच्याच कंपनीमध्ये कामाला असलेल्या प्रणाली (३४) सोबत प्रेमप्रकरण असल्याने घरच्यांना सांगून घरच्यांनी २०११ मध्ये दोघांचे लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर सहा व एक वर्षाच्या दोन मुली, आई, वडील आणि आजी या परिवारासोबत ते राहत होते. मंगळवारी रात्रीच्या वेळी दोघा पती पत्नीचे कोणत्या कारणावरून वाद झाल्याचे सूत्रांकडून कळते. बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास सुनील याच्या मानेवर, छातीवर आणि पोटाच्या डाव्या बाजूला धारदार चाकूने वार केल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झालेला मृतदेह घरच्यांनी पाहिला. पत्नी प्रणाली हिने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देऊन पतीने आत्महत्या केल्याचा बनाव आखला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला, मात्र,  संशय आल्याने पोलिसांनी घरातील सर्वांना चौकशी करिता ताब्यात घेतले. सुनील याच्या वडिलांनी तुळींज ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तपासात पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर पत्नीने हत्या केल्याचे कबूल केले तसेच पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्यामूळे हत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पाटील यांनी लोकमतला बोलतात सांगितले आहे. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक