शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने आत्महत्या केली, नवऱ्याच्या फोटोवर लिहिले; 'मैं बेवफा नहीं हूं... मेरा मंगल मेरी जान ले गया'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:46 IST

Suicide Case : मृताच्या हातावर कथित सुसाईड नोटही लिहिली आहे. ज्यामध्ये ती स्वइच्छेने जीव देत असल्याचे लिहिले आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका महिला शिक्षिकेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सुनेने आत्महत्या केल्याचे सासरच्यांनी पोलिसांना सांगितले, तर मृत महिलेच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केला आहे. मृताच्या हातावर कथित सुसाईड नोटही लिहिली आहे. ज्यामध्ये ती स्वइच्छेने जीव देत असल्याचे लिहिले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायसेन येथील रहिवासी असलेल्या इंदूचा विवाह भोपाळ येथील रहिवासी सुभाष साहू यांच्याशी ३ वर्षांपूर्वी झाला होता. इंदू सरकारी शाळेत शिक्षिका (गेस्ट टीचर) होत्या. गुरुवारी सकाळी इंदूचे पती सुभाष यांनी पत्नीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मृतदेह खाली उतरवला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृताच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली.

पोलिसांना मृतदेहाजवळ पतीचा फोटो सापडला, ज्याच्या मागे 'मी बेवफा नाही' असे लिहिले होते. याशिवाय मृताच्या तळहातावर असेही लिहिले होते की, 'मी माझ्या स्वेच्छेने माझा जीव देत आहे. आई, बाबा, भावा माफ कर. माझ्या मंगळाने माझा जीव घेतला'. पोलिसांनाही हे दोन्ही हस्तलेखन जुळून पाहत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने सांगितले की, पत्नीने गळफास लावून घेतला आहे, तर मृताच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. जावई आपल्या मुलीचा छळ करत असे व संशय घेत असे, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. पण अपघाताच्या काही तास आधी जेव्हा मुलगी फोनवर बोलली तेव्हा तिने सगळं नॉर्मल असल्याचं सांगितलं. मात्र काही तासांनंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू