शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला बेडरुममध्ये बॉयफ्रेंडसोबत पाहिले पतीने अन् तिने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 19:41 IST

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळी उडाली आहे.

ठळक मुद्देही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठवून दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

उत्तर प्रदेश - परक्या पुरुषासोबत बेडरुममध्ये पतीनं पाहिल्यानं महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठवून दिला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळी उडाली आहे.बेडरुममध्ये परक्या पुरूषासोबत पत्नीला पाहिल्यानंतर पतीला धक्काच बसला. त्यानंतर महिला आणि तिच्या पतीमध्ये त्यावेळी मोठा वाद झाला. वादानंतर खजील झालेल्या महिलेनं बंद खोलीत स्वत:ला गळफास लावून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली. पती आणि पत्नीत दोघांमध्ये दररोज वाद होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महिला नाराज होती आणि त्य़ातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी मस्जिद निवास इथे राहणाऱ्या महिलेचे अनैतिक संबंध शेजारी राहणाऱ्या महेशसोबत होते. पतीच्या गैरहजेरीत महेशचे घरी वरचेवर येणं - जाणं सुरु होतं. त्यानंतर दोघांनी घरी कोणी नसल्याचा अंदाज घेऊन महिलेच्या घरी भेटायचे ठरविले. अचानक घरी आलेल्या पतीनं त्यांना बेडरूममध्ये विवस्त्र अवस्थेत पाहिलं आणि पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची पोलखोल झाली. दरम्यान, महिलेला अशा अवस्थेत पाहून पतीचा रागाचा पारा चढला आणि तिथेच दोघांच भांडण झालं. या भांडणानंतर महिलेनं गळपास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस