वरातीत नाचल्याने पत्नीला पट्ट्याने मारहाण; तिघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: June 14, 2023 17:30 IST2023-06-14T17:29:57+5:302023-06-14T17:30:15+5:30

फिर्यादीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Wife beaten with belt for dancing in Varati; A crime against three | वरातीत नाचल्याने पत्नीला पट्ट्याने मारहाण; तिघांवर गुन्हा

वरातीत नाचल्याने पत्नीला पट्ट्याने मारहाण; तिघांवर गुन्हा

सोलापूर : वरातीत नाचल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला पट्ट्याने मारहाण केली. यात पत्नी जखमी झाली आहे. ही घटना १२ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वैदुवाडी भवानी पेठ, शेळगी रोड येथे घडली. याप्रकरणी काजल किरण गुडील (वय २५, रा. वैदूवाडी, भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी काजल यांचे पती किरण याने त्यांना वरातीत का नाचलीस या कारणावरून पट्ट्याने मारहाण केली. त्यात पट्ट्याच्या स्टीलचा बक्कल पंजावर लागून त्या जखमी झाल्या. याप्रकरणी काजल यांच्या फिर्यादीवरून पती किरण गोविंद गुडील, सासरे गोविंद गुडील, दीर दुर्गा गोविंद गुडील (रा. वैदुवाडी, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पैकेकरी करीत आहेत.
 

Web Title: Wife beaten with belt for dancing in Varati; A crime against three