शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने प्रियकर आणि भावोजीच्या मदतीने केली पतीची हत्या, १५ महिन्यांनी झाला केसचा खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:28 IST

मास्टरमाइंड पत्नीने पोलिसांना फसवण्यासाठी पती बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली होती. ही घटना डिसेंबर २०१९ ची आहे. घटनेच्या १५ महिन्यांनंतर आता या ब्लाइंड मर्डरचा खुलासा झाला आहे.

राजस्थानच्या धौलपूरमधून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने प्रियकराच्या आणि भावोजीच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जमिनीत दफन केला. आता तब्बल १५ महिन्यांनंतर या घटनेचा खुलासा झाला आहे. 

मास्टरमाइंड पत्नीने पोलिसांना फसवण्यासाठी पती बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली होती. ही घटना डिसेंबर २०१९ ची आहे. घटनेच्या १५ महिन्यांनंतर आता या ब्लाइंड मर्डरचा खुलासा झाला आहे. पोलीस अधिक्षक केशर सिंह शेखावत यांनी सांगितले की, रूंध पुरा गावात राहणारी फूलन देवीने ९ डिसेंबर २०१९ ला कॅराली जिल्ह्यातील पोलिसात आपला ४५ वर्षीय पती कमल कुशवाह बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. (हे पण वाचा : भयंकर ! महिलेचा खून करून अर्धवट मृतदेह तलावात फेकला )

(Image Credit : Aajtak)

तक्रारीत सांगण्यात आले की, तिचा पती गंगापूरला औषध घेण्यासाठी गेला होता. त्याला कुणीतरी ओळखीचं रस्त्यात भेटलं आणि पैशांचं आमिष दाखवून त्याला सोबत घेऊन गेले. पण बरेच दिवस होऊनही काहीच समोर न आल्याने फूलन देवीचा मुलगा जीतूने बाडी पोलीस स्टेशनमध्ये वडिलांच्या अपहरणाची तक्रार दिली. जीतूने त्याची आई फूलन देवी, मावसा कप्तान आणि बनवारी पंडीत यांच्या विरोधात तक्रार केली.

पुढे तपासातून समोर आले की फूलन देवीचे बनवारीसोबत अनैतिक संबंध आहे. तो एक पशुचिकित्सक आहे. बनवारी फूलन देवीच्या घरी नेहमी येत-जात होता. जेव्हा दोघांच्या संबंधाची माहिती कमल आणि जीतूला लागली तेव्हा त्यांनी विरोध केला. त्यानंतर फूलन देवीने त्याच्या आणि भावोजीसोबत पतीच्या मृत्यूचा प्लॅन तयार केला. (हे पण वाचा : गुंगीचे औषध पाजून चुलत दिरानेच केला महिलेवर बलात्कार, व्हिडीओ केला नातेवाईकांना शेअर)

(Image Credit : Aajtak)

८ डिसेंबर २०१९ ला फूलन देवी तिचे भावोजी कप्तानसोबत पती कमलला औषध देण्यासाठी जात होती. त्यानंतर बसमधून तिघेही एके ठिकाणी उतरले. तिथे बनवारी मोटारसायकलने आला. सर्वांनी कमलला दारू प्यायला दिली. नशेत असतानाच कप्तान आणि बनवारीने त्याला दाबून धरलं आणि फूलन देवीने गमछ्याने गळा आवळून त्याची हत्या केली.

यानंतर बनवारीने मोटारसायकलवरून कमलचा मृतदेह आपल्या रूपसपूर गावात घेऊ आला. येथील त्याच्या शेतात त्याने एक खड्डा करून त्यात कमलचा मृतदेह पुरला. सध्या पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. तर घटनास्थळावरून पुरावे जमा केले गेले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानMurderखून