शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:38 IST

Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये अटक केली. तिनेच राजा रघुवंशीची हत्या केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती म्हटले आहे. 

Sonam Raghuvanshi News: राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर सात दिवसांनी सोनम सापडली. शिलाँगमधून बेपत्ता झालेली सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये होती. वाराणसी-गाजीपूर मुख्य रस्त्यावर असलेल्या काशी ढाब्यावर ती होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे. राजाच्या हत्येच्या प्रकरणात तिला अटक केली आहे. पण, सोनमचे वडील देवी सिंह यांनी हे आरोप फेटाळले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सोनमला अटक करण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सोनमचे वडील देवी सिंह म्हणाले, "लग्न दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने आणि त्या दोघांच्या (राजा आणि सोनम) यांच्या सहमतीनेच झाली होती. तिथले (मेघालय) जे सरकार आहे, ते पहिल्या दिवसापासूनच खोटं बोलत आहे. चुकीचे माहिती देत आहे. अटक करण्यात आलेले तिघे कुठले आहेत, हे तिथल्या सरकारने सांगायला हवे", असे सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह म्हणाले. 

वाचा >>हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक

"माझी मुलगी गाजीपूरमध्ये रात्री आली आणि तिने तिथल्या ढाबेवाल्याच्या मोबाईलवरून तिच्या भावाला कॉल केला. ती रडली आणि त्यानंतर ढाबेवाल्याने तिला मोबाईल दिला. तिने भाऊ गोविंदला कॉल केला. गोविंदने रात्री कॉल केला, तर तोपर्यंत पोलीस त्या ढाब्यावर पोहोचले होते. ते तिला घेऊन आले", असे देवी सिंह यांनी सांगितले. 

"माझे सोनमसोबत बोलणे झाले नाही. गोविंदचे तिच्यासोबत बोलणे झाले. त्याने मला सांगितलं की, सोनम सापडली आहे. आता काळजी करण्याचं कारण नाही. मी निघतोय. गोविंद आता गाजीपूरला पोहोचेन", असेही ते म्हणाले. 

पैसे देऊन हत्या का करेल?

पैसे देऊन राजाची हत्या केल्याचा आरोप सोनमच्या वडिलांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, "आम्ही ही गोष्ट का करू? आमची मुलगीही असे का करेल? असं करायचं असतं, तर ती फिरायला कशाला गेली असती? आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्याचे नियोजन आहे. त्यानंतर अमित शाहांची भेट घेऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार आहोत", असे देवी सिंह म्हणाले.  

अमित शाहांकडे सोनमच्या वडिलांची मागणी 

"माझी अमित शाह यांना विनंती आहे की, सीबीआयची चौकशी करावी. पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे. सगळे पोलीस ठाणे कोठडीत जाईल. तिथले पोलीस खोटं बोलत आहे. माझी मुलगी स्वतः गाजीपूरला आली. ती कशी पोहोचली तिलाच माहिती. तिने ढाब्यावाल्याकडून मोबाईल घेऊन कॉल केला", अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार