शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

बिल्डर डांगरेला पोलीस अटक का करत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 9:55 PM

कागदावर बंगल्याचे स्वप्न दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बिल्डर विजय डांगरेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे पोलीस डांगरेला अटक का करत नाहीत, असा प्रश्न जनमानसात चर्चेला आला आहे.

ठळक मुद्देप्रकरण न्यायप्रविष्ट असताना जागा दुसऱ्याला विकलीच कशी?न्यायालयाचा अवमान : पोलीस मात्र गप्प, पीडितांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कागदावर बंगल्याचे स्वप्न दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बिल्डर विजय डांगरेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे पोलीस डांगरेला अटक का करत नाहीत, असा प्रश्न जनमानसात चर्चेला आला आहे. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या बिल्डर डांगरेला पोलीस पाठीशी घालत असल्याचाही आरोप होत असून, डांगरेला पोलिसांनी तातडीने अटक केली नाही तर पीडित मंडळी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे प्रकरण तसेच आपली व्यथा मांडणार असल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे.सरकारी आरक्षण असलेल्या जागेवर गृहप्रकल्प (बंगलो स्कीम) उभारण्याची जाहिरात करून बिल्डर विजय डांगरे याने अनेकांकडून कोट्यवधी रुपये घेतले. प्रत्यक्षात ही जमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असल्यामुळे या जागेवर अधिकृत बांधकाम करण्याचा प्रश्नच नव्हता. हे माहीत असूनसुद्धा डांगरे याने कटकारस्थान करून, बंगल्याचे स्वप्न दाखवून अनेकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. त्याची बनवाबनवी उघड झाल्यानंतर पीडितांनी डांगरेला आपली रक्कम परत मागितली. तेव्हा तो त्यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न करू लागला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली; तक्रार देऊन अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर अखेर डांगरेविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याहीवेळी डांगरेला अटक करण्याची तसदी घेतली नाही. दलालांच्या माध्यमातून पोलिसांशी सेटिंग करून डांगरे याने पोलीस कोठडीपासून आपला बचाव करून घेतला, अशी त्याहीवेळी जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले. यावेळी डांगरे याने न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केला.दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात डांगरे याला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी बिल्डर डांगरे हा संबंधित पीडितांना जागा देईल किंवा त्या जागेची रक्कम देईल, या अटीवर डांगरे याला जामीन मिळाला होता. मात्र डांगरे याने पीडित व्यक्तींना जमीन दिली नाही आणि ठरल्याप्रमाणे जमिनीची रक्कमही दिली नाही. रक्कम मागायला गेलेल्या व्यक्तींना डांगरे अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याच्या धमक्या देत होता. मारहाण करण्याचाही प्रयत्न करत होता. यासंबंधीच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात आल्या. मात्र डांगरेवर माया दाखवणाºया पोलिसांनी त्या तक्रारीकडे पद्धतशीर दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्यासमोर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार आली. आम्हाला जागा मिळाली नाही, रीतसर विक्रीपत्र आणि ताबापत्र मिळाले नाही आणि न्यायालयाने ठरवून दिल्याप्रमाणे आमची रक्कमही आम्हाला मिळाली नाही. उलट या जागेचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना बिल्डर डांगरे याने दुसºया बिल्डरला ही जागा विकली आणि त्यांनी इथे उभी असलेली घरे अक्षरश: तोडून टाकली, हेही पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या निदर्शनास आणून दिले. मासाळ यांनी पीडितांची व्यथा ऐकून तातडीने दखल घेतली आणि हुडकेश्वर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा गुन्हा दाखल होऊन आता तीन दिवस झाले आहे. मात्र डांगरेला पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही. या प्रकरणात न्यायालयाचा उघड अवमान झाला आहे. मात्र न्यायालयाचा अवमान करूनही बिल्डर डांगरेला अटक करण्याची तसदी पोलीस घेत नाहीत. त्यामुळे पोलीस का कचरत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ गुन्हा दाखल करून पोलीस शांत का बसले, डांगरे याला अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी पोलीस वाट बघत आहेत का, डांगरेला कोण वाचवत आहेत, असे प्रश्नही चर्चेला आले आहेत. दरम्यान, यामुळे पीडितांची तीव्र मानसिक कोंडी झाली आहे.अनेक वर्षांपासून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेतल्यानंतर बिल्डर डांगरे याच्याकडून होत असलेली मानहानी असह्य झाल्यामुळे आणि पोलीसही डांगरेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची भावना झाल्यामुळे पीडितांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे बिल्डर डांगरे याला पोलिसांनी तातडीने अटक केली नाही तर हे प्रकरण थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे नेऊन आपली व्यथा मांडण्याची तयारी त्यांनी चालवली आहे.खरेदीदार बिल्डरची भूमिका संशयास्पदप्रकरण न्यायप्रविष्ट असताना डांगरे याने ती जागा मुकुंद देशमुख नामक बिल्डरला विकून टाकली. कोणताही बिल्डर जागा विकत घेताना एकूणएक कागदपत्र बघतो. जागेचा वाद सुरू आहे का, याची खात्री करून घेतो. बिल्डर देशमुख यांनी मात्र न्यायालयात वाद सुरू असलेली जागा विकत घेतली. एवढेच नव्हे तर बिल्डरने येथे उभी असलेली पीडितांची घरे पाडून टाकली. ज्या जागेचा न्यायालयात वाद सुरू आहे, अशी जागा बिल्डर देशमुखने विकत घेतलीच कशी, असा मुद्दा आहे. त्यामुळे खरेदीदार बिल्डरही संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, हा मुद्दाही स्वतंत्र तपासाचा विषय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी