शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.कार्यालयात अभियंत्याने कशासाठी स्वीकारले पैसे? व्हायरल व्हिडिओमुळे शंकांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 23:22 IST

Crime News: घरकुल योजनेत नावे समाविष्ट करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना चिरमिरी दिल्याशिवाय लाभार्थ्याचे नाव समाविष्ट होत नसल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकाकडून केला जात आहे.

नागपूर (काटोल) : काटोल पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता रंगनाथ पवार कार्यालयात पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पवार यांनी कशासाठी पैसे घेतले, हे अद्याप स्पष्ट नसले तरी रमाई योजने अंतर्गत घरकूल यादीत नाव समाविष्ट करून देण्यासाठी त्यांनी ही रक्कम स्वीकारल्याची चर्चा आहे.घरकूल योजनेत नावे समाविष्ट करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना चिरमिरी दिल्याशिवाय लाभार्थ्याचे नाव समाविष्ट होत नसल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकाकडून केला जात आहे. यावरून एका संतप्त नागरिकाने हा व्हिडिओ काढल्याची माहिती आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीची जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशीही मागणी जोर धरत आहे.

राज्य सरकारच्या वतीने अनुसूचित जाती जमातींच्या नागरिकांकरिता रमाई योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाकरिता १.५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाते. मात्र काटोल पंचायत समिती अंतर्गत या योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी कर्मचाऱ्याकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप केला जात आहे. इतकेच काय तर घरकूल मंजूर करून घेण्याकरिता चक्क दहा हजारांची बोली लागल्याचेसुद्धा बोलले जात आहे.

दोन दिवसापूर्वी पंचायत समिती कार्यालयात स्थापत्य अभियंता पवार यांनी तालुक्यातील एका सरपंचाकडून पैसे स्वीकारण्याचा हा व्हिडिओ आहे. मात्र हे पैसे नेमके कोणाचे आहे आणि कशासाठी स्वीकारण्यात आले याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. हा व्हिडिओ या योजनेत नाव समाविष्ट होण्याकरिता धडपड करीत असलेल्या या व्यक्तीने काढल्याची माहिती आहे. आता त्याचेच नाव योजनेत समाविष्ट करण्यासाठी त्याला प्रलोभन दिल्या जात असल्याची माहिती आहे. यासंदर्भात काटोल पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी संजय पाटील यांना विचारणा केली असताना व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर योग्यपणे सांगता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सत्ताधारी देणार का लक्ष?

काटोल पंचायत समितीवर शेकाप व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. यात सभापतिपद हे शेकापकडे तर उपसभापतिपद राष्ट्रवादीकडे आहे. मात्र पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांकडे लक्ष नाही की यात सर्वांचाच वाटा आहे, हा गंभीर प्रश्न व्हायरल व्हिडिओच्या निमित्ताने विचारला जात आहे. दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्याने पैसे स्वीकारले त्यांच्याकडे रमाई योजनेची तालुक्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. याअंतर्गत हा व्यवहार झाला का ,हेही तपासणे गरजेचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाnagpurनागपूर