शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:49 IST

भिखारी सिंह म्हणाले की, "मोठी मुलगी कंचनने अनेकदा सांगितले होते की, निक्कीला सासरच्या मंडळींकडून मारहाण होते. जेव्हा कंचनने याचा विरोध केला, तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली."

ग्रेटर नोएडा येथील हुंड्याच्या बळी ठरलेल्या निक्की भाटी हिला जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर, तिच्या वडिलांचे दुःख प्रत्येक शब्दात जाणवत आहे. भिखारी सिंह यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देताना सांगितले, "आम्ही आमच्या कुवतीपेक्षा जास्त देऊन मुलींची लग्ने केली. स्कॉर्पियो, बुलेट, रोख रक्कम... एका शेतकऱ्याला जे काही शक्य आहे, ते सर्व आम्ही केले." समाजाने घालून दिलेल्या परंपरेचे पालन करत मुलींच्या आनंदासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण सासरच्या मंडळींच्या लोभीपणाने आणि क्रूरतेने त्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त केले.

मुलींच्या आनंदासाठी आम्ही सर्व काही केले!वडिलांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलींना नेहमीच चांगले जीवन देण्याचा प्रयत्न केला. "आम्ही तिला कधीही बसमध्ये लटकू दिले नाही. नेहमी आमच्या गाडीतून पाठवले. डीपीएसमधून शिकवले. मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले. पण ज्या घरात त्यांनी मुलींना पाठवले, तिथून त्यांना केवळ वेदनाच मिळाल्या."

भिखारी सिंह म्हणाले की, "मोठी मुलगी कंचनने अनेकदा सांगितले होते की, निक्कीला सासरच्या मंडळींकडून मारहाण होते. जेव्हा कंचनने याचा विरोध केला, तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली."

म्हणून पुन्हा मुलींना सासरी पाठवले!परिस्थिती बिघडल्यावर अनेकदा त्यांनी मुलींना माहेरी बोलावले होते. "आम्ही आमच्या मुलींना घरी घेऊन आलो होतो, पण समाजाने आणि पंचायतीने हस्तक्षेप केला आणि मुलींना परत सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला." परिस्थिती सुधारेल, अशी आशा त्यांना होती, पण सासरच्या लोकांच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही. निक्कीच्या सासूच्या वागणुकीवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "निक्कीची सासू तिचे केस ओढायची आणि मुलाकडून तिला मारहाण करायला लावायची. अशी आई मी पहिल्यांदाच पाहिली. एक आई असे कसे करू शकते?" असे ते म्हणाले.

एकाच घरात दोन मुलींची लग्ने का केली?दोन मुलींची लग्ने एकाच घरात का केली, या प्रश्नावर भिखारी सिंह म्हणाले, "त्यांच्याकडे दोन मुले होती आणि आमच्याकडे दोन मुली. घर लहान होते, म्हणून दोन्ही बहिणी सोबत राहतील आणि आनंदी राहतील, असा विचार आम्ही केला. पण असे काही होईल, याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. आम्ही मुलींच्या चांगल्या भविष्याचे स्वप्न पाहिले होते, पण ते स्वप्न तुटले."

लग्नानंतरही हुंड्याची मागणी थांबली नाही. "आधी स्कॉर्पियो आणि बुलेट घेतली. नंतर कधी मर्सिडीज मागितली, तर कधी लाखोंची रोख रक्कम. त्यांनी ३६ लाख रुपयांची मागणीही केली होती. आमच्या मुली पार्लर चालवत होत्या, तिथूनही ते पैसे चोरू लागले. कोणतेही कामधंदा नाही, फक्त पैशांसाठी दबाव टाकायचे."

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारdelhiदिल्ली