शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडी अनिल देशमुख यांना विचारणार 'हे' प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 18:59 IST

Anil Deshmukh :ईडीचे सहाय्यक संचालक तसिन सुलतान चौकशी करत आहेत. तसीन सुलतान हेही या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. याआधी त्यांना ५ वेळा समन्स बजावण्यात आले होते. देशमुख सोमवारी सकाळी ११.४० वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर १३ तासांनंतर देशमुख यांना ईडीने रात्री १ वाजताच्या सुमारास अटक केली. देशमुख यांची सध्या चौकशी सुरू आहे. ईडीचे सहाय्यक संचालक तसिन सुलतान  चौकशी करत आहेत. तसीन सुलतान हेही या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत.'वसुली प्रकरणात' अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. देशमुख यांनी गृहमंत्री असताना १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. या संदर्भात त्याची चौकशी करण्यात येत आहे.देशमुखांना ईडी कोणते प्रश्न विचारणार?- माजी एपीआय सचिन वाजे यांना तुम्ही ओळखता का?मुंबई पोलिसांचे एसीपी सचिन पाटील यांना तुम्ही ओळखता का?- सचिन वाझे आणि सचिन पाटील यांच्या किती वेळा भेटी झाल्या? आणि या बैठकांचा उद्देश काय होता?- या बैठकीत बार आणि रेस्टॉरंटमधून दर महिन्याच्या वसुलीवर चर्चा झाली का?सचिन वाझे आणि सचिन पाटील यांना वसुलीचे टार्गेट दिले होते का?- बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून कधीपासून वसुली केली जात होती?- कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे तुमच्यासोबत काम करतात का?- सचिन वाझे यांनी किती वसुली केली आणि शिंदे यांना किती दिले? डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान वाजे यांनी शिंदेला किती रक्कम दिली?- श्री साई शैक्षणिक संस्था तुम्ही किंवा तुमचे कुटुंब चालवतात का?तुमच्या ट्रस्टला ४.३ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ही देणगी कोणी दिली?- पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचे प्रकरण पाहिले का?- पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी किती रक्कम आकारण्यात आली?बदली आणि पोस्टिंगमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे?गृह मंत्रालयाने बदली आणि पोस्टिंगद्वारे किती पैसे जमा केले?- तुमच्याशिवाय आणखी कोणाला फायदा झाला?मार्चमध्ये परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांना होमगार्डचे डीजी बनवण्यात आले. यानंतर परमबीर सिंह यांचे एक पत्र म्हणजेच लेटरबॉम्ब समोर आले, जे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे यांच्याकडे दरमहा १०० कोटींची मागणी केल्याचा दावा त्यांनी या पत्रात केला होता. यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयArrestअटकsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंग