कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?; खुद्द मंत्री महोदयांनीच केला 'दुसऱ्या पत्नी'बाबत जाहीर खुलासा

By प्रविण मरगळे | Published: January 13, 2021 11:55 AM2021-01-13T11:55:22+5:302021-01-13T11:55:52+5:30

Dhananjay Munde Rape Allegation News: या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.

Who is Karuna Dhananjay Munde ?; The Minister himself made a public statement about 'second wife' | कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?; खुद्द मंत्री महोदयांनीच केला 'दुसऱ्या पत्नी'बाबत जाहीर खुलासा

कोण आहेत करुणा धनंजय मुंडे?; खुद्द मंत्री महोदयांनीच केला 'दुसऱ्या पत्नी'बाबत जाहीर खुलासा

googlenewsNext

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्याने खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने लावला आहे. याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. परंतु ही महिला कोण आहे? धनंजय मुंडे आणि पीडित महिलेचे ओळख कशी असा प्रश्न निर्माण झाला, त्यावर खुद्द धनंजय मुंडे यांनीच सोशल मीडियावर जाहीर खुलासा केला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणु शर्मा नावाच्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र या महिलेचे आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत, संपूर्ण वस्तूस्थिती वेगळी आहे असं धनंजय मुंडेंनी सांगितले. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे असं त्यांनी सांगितले.

तर मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने  केलेल्या आहेत. मात्र, २०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात  करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की, या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे. तथापि रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत, त्यांनी माझ्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे. माझ्याकडे रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅंकमेलिंग करत कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएसमसरुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे यासाठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो असा दावाही धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आला आहे.

 

Web Title: Who is Karuna Dhananjay Munde ?; The Minister himself made a public statement about 'second wife'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.