शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत शिक्षण, मुंबईत मॉडलिंग, जाणून घ्या कोण आहे महाठग सुकेश चंद्रशेखरची पत्नी आणि क्राइम पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 12:15 IST

Leena Maria Paul : अनेक राज्यातील पोलीस बघता बघता दोघांच्या मागे लागले. आम्ही सांगतोय महाठग सुकेश चंद्रशेखरची पत्नी आणि त्याी क्राइम पार्टनर लीना मारिया पॉलबाबत.

Leena Maria Paul :  दुबईमध्ये शिक्षण केल्यानंतर ती भारतात आली. इथे आल्यावर तिने मॉडलिंगच्या विश्वात पाउल ठेवलं. त्यानंतर काही दिवसातच तिने साऊथ इंडियन सिनेमांमध्ये अभिनय सुरू केला. हळूहळू तिला ओळख मिळाली. यादरम्यान तिची ओळख सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrashekhar) झाली. दोघे जवळ आले. त्यानंतर साऊथची ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या अभिनेत्रीने आपल्या महाठग पतीसोबत मिळून असा काही खेळ खेळला की, अनेक राज्यातील पोलीस बघता बघता दोघांच्या मागे लागले. आम्ही सांगतोय महाठग सुकेश चंद्रशेखरची पत्नी आणि त्याी क्राइम पार्टनर लीना मारिया पॉलबाबत.

देशातील सर्वात मोठा महाठग सुकेस चंद्रशेखरची प्रेयसी आधी त्याची लाइफ पार्टनर बनली आणि नंतर त्याचीी क्राइम पार्टनरही बनली. तिची कहाणी सुद्धा इंटरेस्टींग आहे. साऊथ सिनेमांची ब्युटी क्वीन लीना मारिया पॉल. ग्लॅमरच्या दुनियेतील हुशार हुस्न परी आहे. 

टॉलिवूड म्हणजे साऊथ इंडियन सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारी आणि जॉन अब्राहमचा सिनेमा मद्रास कॅफेमध्ये हिरोईनची भूमिका साकारणारी लीना मारिया पॉलचा सुरूवातीचा प्रवास भलेही आलिशान होता. पण ती आता तिहार तुरूंगात आपल्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत आहे.

लीना मारिया पॉलला पोलिसांनी लेडी नटवरलाल ही उपाधि उगाच दिली नाही. लाइफ पार्टनर आणि क्राइम पार्टनरसोबत मिळून लीनाने मोठमोठे कारनामे केले. दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या एका इंजिनिअरच्या मुलीची मोठमोठी स्वप्ने आणि कमी काळात सुपरस्टार बनण्याच्या स्वप्नाने तिला तुरूंगात पाठवलं.

२०११ मध्ये दुबईहून लीना मुंबईत मॉडलिंगच्या दुनियेत काम करण्यासाठी आली. इथे तिची भेट सुकेश चंद्रशेखरसोबत झाली. ज्यानंतर आधी प्रेम आणि मग लोकांची फसवणूक करण्याचा मोठा खेळ सुरू झाला. सुकेशने मारियाला मॉडलिंगची काही कामे मिळवून दिली आणि मग आपल्यासोबत चेन्नईला घेऊन गेला. मॉडलिंगमधून सिनेमात येण्याला काहीच दिवस गेले होते. पण लीनाची श्रीमंत होण्याची आणि प्रसिद्धीची हौस यामुळे ती सुकेशच्या ती आणखी जवळ आली.

चेन्नईमध्ये बॉयफ्रेन्डच्या मदतीने लीनाला अनेक सिनेमात मुख्य भूमिका मिळाल्या. बघता बघता ती लोकप्रिय झाली. काही काळाने मारियाला समजलं की, सुकेशच्या सर्व कमाईचा मार्ग फसवणूक हाच आहे. सुकेश स्वत: आयएएस ऑफिसर बनून नवनवीन प्रोजेक्ट पास करण्याच्या नावावर पैसे घेत होता किंवा बॅंकेकडून लोन घेत होता. त्यानंतर पैसे हाती येताच तो गायब व्हायचा. त्यानंतर या कामात त्याने लीनाला आपलं पार्टनर बनवलं.

दोघांनी अनेक वर्ष राजे-महाराजांसारखं जीवन जगले. दोघेही एका महालासारख्या आलिशान बंगल्यात राहत होते. पण सगळं बदलायला वेळ लागत नाही. या दाम्पत्याची वेळही बदलली आणि दोघे तुरूंगात पोहोचले. सोबत प्रेम आणि फसवणुकीची स्क्रीप्ट लिहिणारे सुकेश चंद्रशेखर आणि लीना मारिया पॉल आता तुरूंगाची हवाही सोबतच खात आहेत. आता तर दोघांना एकमेकांना भेटताही येत नाहीये. हेच कारण आहे की, सुकेशने पत्नीला भेटण्यासाठी तुरूंगात उपोषण सुरू केलं आहे. जे तुरूंग व्यवस्थापनाची डोकेदुखी ठरत आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTollywoodTollywoodfraudधोकेबाजी